भावनिक क्षण; वडील क्रांतीवीर जीडी लाडांच्या जयंतीदिनी अरूण लाडांची आमदारकीची स्वप्नपूर्ती

मुंबई | वडील क्रांतिवीर जीडी लाड यांच्या जयंतीनिमित्त अरुण लाड यांच्या आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. अरुण लाड यांचे वडील हे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारच्या सशस्त्र तुफानी सेनेचे सेनापती होते.

अण्णांचा म्हणजे अरुण लाड यांचा जन्म व्हावा की नाही हा संभ्रम जीडी लाड आणि त्यांच्या पत्नी यांच्या मनात होता. पण आज अरुण लाड यांनी त्यांचे वडील जीडी लाड यांच्या जयंतीच्या दिवशी आमदार होऊन आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले आहे.

महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३३२१ मतं, ४८  हजार ८२४ मतांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार
पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला होता.

महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३३२१ मतं, ४८  हजार ८२४ मतांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

पुणे पदवीधरमध्ये भाजपला भगदाड; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी जोरात
रेखा जरे हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटलांचे प्रचंड धक्कादायक खुलासे
पुणे ते नागपूर भाजप भूईसपाट! विधान परिषदेत महाविकासआघाडीचा डंका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.