विजयी होताच अरुण लाड म्हणतात, ‘माझ्या विजयात चंद्रकांतदादांचा मोठा वाटा, कारण…’

मुंबई | पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या गडाला सुरुंग लागला आहे. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पुणे पदवीधर मतदार संघात पहायला मिळाली. यामध्येच महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का देत पुणे मतदारसंघ काबिज केला आहेत.

महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३३२१ मतं, ४८  हजार ८२४ मतांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

‘माझ्या विजयात चंद्रकात पाटील यांचा मोठा वाटा आहे. कारण त्यांनी दोन वेळा या मतदारसंघातून निवडून येऊनही पदवीधरांसाठी काहीही काम केले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पदवीधरांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले, अशी प्रतिक्रिया पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी आपल्या विजयाबाबत बोलताना व्यक्त केली.

‘मला ही संधी चंद्रकांत दादांमुळेच मिळाली. माझे राहिलेले काम संग्राम देशमुख करतील, असे दादा दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. प्रत्यक्षात दादांनी कामच केले नव्हते. त्यामुळे युवकांचा व पदवीधरांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे सगळ्यांनी हा बदल घडवत महाविकास आघाडीकडून कामाची अपेक्षा व्यक्त केली आहे,’ असे लाड म्हणाले.

भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार  

पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला होता.

महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३३२१ मतं, ४८  हजार ८२४ मतांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नेहा कक्करच्या सुखी संसाराची सुरुवात होतास एक्स बॉयफ्रेंडने केला मोठा खुलासा…
आता भाजपनेही कंगनाला फटकारले; ‘या’ प्रकरणी जाहीर माफी मागण्याचा दिला आदेश
शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या कंगणावर भडकला दिलजीत दोसांज, म्हणाला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.