आजपर्यंत आपण अनेक अभिनेत्यांबद्दल जाणून घेतले आहे. पण खुप कमी अभिनेते असे आहेत ज्यांचे नाव त्यांच्या कामामूळे अजरामर झाले आहे. अशाच एका अभिनेत्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यांना बघितल्यानंतर लोकांच्या मनात श्रद्ध्ची भावना उत्पन्न होते.
या अभिनेत्याचे नाव आहे अरुण गोविल. त्यांना ‘रामायण’ मालिकेतील रामाच्या भुमिकेसाठी ओळखले जाते. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत त्यांनी राम ही भुमिका निभावली होती. आजही लोकं त्यांना या भुमिकेमूळेच ओळखतात.
अरुण गोविलचा जन्म १२ जानेवारी १९५८ ला झाला होता. त्यांनी तामिळ, कन्नड, हिंदी, तेलगू आणि भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या भुमिका केल्या. पण त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी राम या भुमिकेमूळे मिळाली.
अरुण गोविंदने सायन्समधून त्यांचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर ते भावाचा व्यवसाय सांभाळण्यासाठी मुंबईत आले. काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना समजले की, ते व्यवसाय करु शकत नाहीत. त्यांना अभिनयात रुची आहे.
त्यांनी कॉलेजमध्ये अनेक नाटकांमध्ये काम केले होते. म्हणून त्यांनी अभिनयात काही तरी करण्याचा निर्णय घेतला. १९७७ साली त्यांनी ‘पहेली’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. या चित्रपटात त्यांची भुमिका छोटी होती. पण त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने ही भुमिका साकारली होती.
त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. काही चित्रपटांमध्ये ते मुख्य अभिनेता होते. पण त्यांना खरी ओळख रामायण मालिकेमूळेच मिळाली. त्यांनी ‘विक्रम आणि वेताळ’ मालिकेत काम केले. ही मालिका खुप जास्त हिट झाली.
या कालावधीमध्ये रामानंद सागर रामायण मालिकेवर काम करत होते. ही गोष्ट ज्यावेळी अरुण यांना समजली. त्यावेळी ते स्वत: रामानंदला भेटायला गेले. त्यांनी राम ही भुमिका निभावण्याची इच्छा जाहीर केली. या गोष्टीला रामानंद यांनी नकार दिली.
त्यांनी अरुणला भरत आणि लक्ष्मण या दोन भुमिकांच्या ऑफर दिल्या. पण त्यांनी हट्ट सोडला नाही. त्यांना राम हिच भुमिका साकारायची होती. म्हणून त्यांचे ऑडिशन घेण्यात आले. ऑडिशन घेतल्यानंतर रामानंद सागरने त्यांना रामच्या भुमिकेसाठी निवडले.
अरुण यांनी देखील अतिशय उत्तम पद्धतीने राम ही भुमिका साकारली. दुसरा कोणताही अभिनेता ही भुमिका एवढ्या व्यवस्थित पद्धतीने निभावू शकला नसता. त्यांनी त्यांच्या अभिनयाने राम ही भुमिका अजरामर केली. आहे. राम हे नाव ऐकल्यानंतर सर्वात पहीले अरुण यांचाच चेहरा आठवतो.
रामायण मालिका आजपर्यंतची सर्वात प्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेला कोणीही विसरु शकत नाही. ही इंडियन टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध मालिका आहे. पण ही मालिका संपल्यानंतर अरुणला कोणताही निर्मात किंवा दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटामध्ये घेण्यासाठी तयार नव्हता.
कारण अरुणला प्रेक्षक राम म्हणून ओळखत होते. त्यांना दुसऱ्या कोणत्याही भुमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक तयार नव्हते. या गोष्टीमूळे त्यांचे करिअर संपूष्टात आले होते. त्यांना चित्रपट मिळत नव्हते. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांची स्वत: काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी स्वत: ची निर्मिती संस्था सुरु केली. त्यात अनेक मालिकांची निर्मिती करण्यात आली. पण त्यांना दुसरी कोणतीही भुमिका करता आली नाही. कारण प्रेक्षक त्यांना दुसऱ्या भुमिकेत स्वीकारत नव्हते. शेवटी त्यांनी धार्मिक मालिकांमध्येच काम केले.
त्यांनी अभिनेत्री श्रीलेखासोबत लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. अरुण गोविलची एकूण संपत्ती ९५ करोडची आहे. कारण त्यांनी जास्त मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले नाही. पण ते स्वत: चा व्यवसाय सांभाळत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
भगवान रामाची भुमिका साकारण्यासाठी अरूण गोविल यांनी केले होते ‘हे’ काम, वाचून आश्चर्य वाटेल
बाॅलीवूडचा सर्वात यशस्वी खलनायक महेश आनंदचा मृतदेह दोन दिवस सडत पडला होता..
विवाहीत असूनही बॉबी देओलच्या घरात राहते बॉलीवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री
बापरे! अवघ्या काही वर्षांमध्येच कियारा अडवाणी झाली करोडोंंच्या संपत्तीची मालकीण; बघा घराचे फोटो