‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ‘या’ कलाकाराचे झाले निधन, कलाविश्वात हळहळ

मुंबई । सध्या कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांना कोरोनाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन असल्याने काही प्रमाणात मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना आता या मालिकाचे पुढील भाग पाहता येत आहेत.

आता माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील एका कलाकाराचे निधन झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. अभिनेता विजय वीर यांचे निधन झाल्याचे समजते आहे. विजय वीर हे सहकलाकार म्हणून मालिकेत काम करत होते.

या मालिकेतील गुलमोहर सोसायटीतील वॉचमनची भूमिका ते साकारत होते. २० जुलै रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. यामुळे याची बातमी समजताच कला विश्वास सर्वांना एकच धक्का बसला.

निधनाची बातमी ऐकताच सहकलाकारांनी दुःख व्यक्त केले. या मालिकेव्यतिरिक्त विजय वीर यांनी नऱ्या आणि माधव अशा काही मराठी, हिंदी सिनेमात देखील काम केले होते. अनलॉकनंतर आता मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

आता मात्र गुलमोहर सोसायटीचे वॉचमन त्यांच्या भेटीला येणार नाहीत. यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले. गेल्या अनेक दिवसांपासून ते या मालिकेत काम करत होते.

झी मराठीवरील मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. लॉकडाऊनमुळे मालिकांच चित्रिकरण थांबल होते. आता या नव्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना वॉचमन काकांना पाहता येणार नाही.

ताज्या बातम्या

या दोन चिमुकल्यांची डान्सची जुगलबंदी पाहून तुम्ही पण पोट धरुन हसाल; पहा व्हिडिओ

सोलापुरच्या त्या दीड कोटीच्या मोदी बकऱ्याचा मृत्यू; मालकाने स्वत:च्या मुलासारखा केला होता सांभाळ

जिल्हाधिकारी नाही देवदुत! ना बेडची कमी ना ऑक्सिजनची; नंदूरबारच्या कलेक्टरने करून दाखवलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.