रांची : भारताच्या पराभवाचा खरा खलनायक अर्शदीप सिंग ठरल्याची चर्चा जोरात सुरू आहे. पण आता त्याचा पुरावा सापडला आहे. आता असे समोर आले आहे की, अर्शदीपने गोलंदाजीतच नाही तर फलंदाजीतही हाराकिरी केली. त्यामुळेच भारत हरला.
भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते. पण अर्शदीप सिंग 20 वे ओव्हर टाकायला आला आणि तिथे भारताचे एकामागून एक नुकसान होऊ लागले. या षटकात अर्शदीपने नो बॉल टाकला आणि त्यावर फलंदाजाने षटकार मारला. यानंतर फ्री हिट देण्यात आला आणि तोही षटकार गेला.
त्यामुळे अर्शदीपच्या या एका षटकात भारताने 27 धावा गमावल्या. त्यामुळे न्यूझीलंडला १७६ धावांपर्यंत मजल मारता आली. पण 177 धावा करणे भारतासाठी अशक्य नव्हते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची धावसंख्या 3 बाद 15 अशी झाली. यानंतर सूर्या आणि हार्दिक पांड्याने काही काळ फलंदाजी केली.
पण हे दोघेही पाच चेंडूंच्या आत बाद झाले आणि भारत हा सामना हरणार असे चाहत्यांना वाटू लागले. पण त्यावेळी वॉशिंग्टन सुंदरने अनपेक्षितपणे सुंदर फलंदाजी केली. वॉशिंग्टन सुंदर हा ताकदवान फलंदाजी करत होता. अशा स्थितीत तो भारतासाठी हा सामना जिंकू शकेल, असे वाटत होते. मात्र यावेळी अर्शदीप सुंदरच्या वाटेत अडसर आल्याचे दिसून आले.
हे 18 व्या षटकात घडले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कुलदीप यादव बाद झाला. त्यानंतर अर्शदीप फलंदाजीला आला. यावेळी सुंदर खेळपट्टीवर चांगलाच सेट झाला होता. त्यामुळे तो चांगला फटकेबाजी करू शकतो हे सर्वांनाच वाटत होते. पण यावेळी अर्शदीप सिंग पुन्हा खलनायकाच्या भूमिकेत दिसला.
कारण यावेळी अर्शदीपला फक्त एक धाव करायची होती आणि सुंदरला स्ट्राईक द्यायचा होता. पण या 18व्या षटकातील पाचही चेंडूंमध्ये अर्शदीपला एकही धाव मिळाली नाही आणि हे षटक निर्धाव राहिले. सुंदर फटकेबाजी करत असताना भारताचा २१ धावांनी पराभव झाला. अर्शदीपने सुंदरला खेळण्यासाठी काही चेंडू दिले असते तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे खेळला गेला. जिथे न्युझीलंड संघाने 21 धावांनी सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
या सामन्यात (IND vs NZ) टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंड संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात (IND vs NZ), सलामीवीर ड्वेन कॉनवे आणि डॅरिल मिशेल यांनी टीम इंडियाविरुद्ध शानदार अर्धशतके झळकावली. किवी संघासाठी कॉनवेने 35 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली.
त्याचवेळी मिशेलने 30 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याच्याशिवाय फिन ऍलनने 35 धावांचे मोठे योगदान दिले. यामुळे त्यांना मोठा स्कोअर करता आला.