Share

Arshdeep Singh : अर्शदीप सिंगला खलिस्तानी संबोधणाऱ्या पाकीस्तानची घाणेरडी चाल झाली उघड; जगभरातून निषेध

Arshdeep Singh

Arshdeep Singh  : २३ वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या आशिया कप २०२२ साठी संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आहे. भारतीय संघाकरिता दीर्घ काळ चांगली कामगिरी करणारा हा युवा वेगवान गोलंदाज काल पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. ज्यावेळी शेवटच्या षटकात सामना गंभीर स्थितीत होता, त्यावेळी त्याने पाकिस्तानचा फिनिशर आसिफ अलीची एक सोपी कॅच सोडली.

या घटनेनंतर पाकिस्तानी फलंदाजाने अवघ्या आठ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या खेळीने त्याने आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात अर्शदीप सिंगच्या निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक पोस्टमध्ये त्याचे वर्णन खलिस्तानी असे केले जात आहे. सोशल मीडिया कार्यकर्ते अंशुल सक्सेनाने एकामागून एक ट्विट करत पाकिस्तानची भीती व्यक्त केली आहे. याशिवाय विकिपीडिया पेजवरही भारतीय क्रिकेटपटूंवर निशाणा साधण्यात आला आहे. याठिकाणी खलिस्तानी म्हणून त्यांचे वर्णन करण्यात आले आहे.

अंशुल सक्सेनाने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी इथे जे शेअर केले आहे तो फक्त एक नमुना आहे.’ त्यामुळे पाकिस्तानी युजर्सने अर्शदीप सिंगला खलिस्तानी म्हणत टार्गेट करण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुर्दैवाने भारतातही काही लोक यात सहभागी झाले आहेत आणि अर्शदीपला अशाच प्रकारे ट्रोल करत आहेत. पाकिस्तानलाही हेच हवे आहे.

मात्र, भारतीय क्रिकेटपटूच्या मदतीसाठी अनेक खेळाडू पुढे आले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिजनेही ट्विट करत अर्शदीपचा बचाव केला आहे. हाफिजने ट्विटमध्ये लिहिले की, ‘भारतीय संघाच्या सर्व चाहत्यांना माझी विनंती आहे की, आपण सर्वजण खेळात चुका करतो. आपण सर्व मानव आहोत. कृपया या चुकांमुळे कुणाचेही मन दुखवू नका.”

२०१९ मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अर्शदीप सिंग एक भाग होता. सध्या तो भारतीय संघासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये भाग घेत आहे. त्याने देशासाठी आतापर्यंत नऊ टी-२० सामने खेळले असून त्यात १३ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये १२ धावा देऊन तीन विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

महत्वाच्या बातम्या
Devendra Fadanvis : ‘अभी नही तो कभी नही’ या आवेशाने लढायचं, मुंबईवर भाजपचेच वर्चस्व पाहीजे; फडणवीसांचा आदेश
सावंतांकडून शिवसेनेला भलं मोठं भगदाड; हजारो कार्यकर्ते-पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार, थेट उद्धव ठाकरेंना धक्का
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now