Share

Virat Kohli : VIDEO : दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए! अहंकारी विराट अखेर सूर्यापुढे झुकला, Video मध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय…

Virat Kohli Suryakumar Yadav

Virat Kohli : नुकताच दुबईमध्ये आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध हॉंगकॉंग हा सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने हॉंगकाँगचा ४० धावांनी पराभव करत विजय मिळवला. मात्र, या स्पर्धेत एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ही घटना म्हणजे कायम गुर्मीत असलेला विराट कोहली चक्क सूर्यकुमार यादवसमोर झुकला आहे. केएल राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहलीसोबत सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. यावेळी सूर्यकुमार यादव असा काही खेळला की, विराट कोहलीला त्याच्यासमोर झुकायला भाग पडले.

या सामन्यात विराट कोहलीने ४४ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने तब्बल ६ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याने २६ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी खेळली. सूर्यकुमारने शेवटच्या षटकात ३ चेंडूत सलग ३ षटकार मारत चाहत्यांची मनं जिंकली. तसेच त्याने २२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.

सूर्यकुमार यादवचा हा अवतार पाहून विराट कोहलीही त्याच्यासमोर झुकला. सूर्यकुमार यादव मैदानाच्या बाहेर जात असताना कोहली व तो समोरासमोर आले. त्याच क्षणी विराट कोहलीने सूर्यकुमार यादवसमोर झुकत त्याला नमस्कार केला. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

IPL २०२० मध्ये विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव आमनेसामने आले होते. त्यावेळी विराट कोहली रागारागात सूर्यकुमार यादवसमोर येऊन उभा राहिला होता. त्यावेळी दोघेही एकमेकांकडे रागात बघत होते. मात्र, आता त्याच विराट कोहलीने सूर्यकुमारसमोर झुकत त्याचे कौतुक केले आहे.

आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यातही भारताने ५ विकेट्स घेत पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर आता हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात भारताने १९२ धावा करत विजय प्राप्त केला आहे. यापुढचा भारताचा सामना येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या
सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; समोर आलेल्या नव्या माहितीने सगळेच हादरले
ज्युस पिल्यामुळे तोंडापासून ते पोटापर्यंत पडले चट्टे; महिलेचा झाला मृत्यू, परिसरात खळबळ
कोरोना काळात नरेंद्र मोदींनी अनेक नवीन औषधांचे शोध लावले; नारायण राणेंचा दावा
मराठी कलाकारांनी केलं बाप्पाचं भव्य स्वागत; पहा देखाव्यांचे दिमाखदार फोटो

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now