“हिरेन यांची हत्या सचिन वाझेंनीच केली, त्यांना तात्काळ अटक करा”- देवेंद्र फडणवीस

मुंबई  | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेगवेगळे आरोप होऊ लागल्याने स्फोटक प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

हिरेन यांची पत्नी विमला यांनी पतीची हत्या झाली असून त्यांची हत्या सचिन वाझे यांनी केली असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. मनसुख हिरेन प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा विधानसभेत राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. तसेच त्यांनी हिरेन यांच्या पत्नी कमला यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीची प्रत वाचून दाखवली आहे.

मनसुख यांची गाडी चार महिने सचिन वाझे वापरत होते. त्यांनी माझ्या पतीची चौकशी केली. सचिन वाजे माझ्या पतीला म्हणाले होते या प्रकरणात अटक हो मी तुला जामीनावर सोडवतो. त्यानंतर माझे पती तणावात होते. त्यामुळे सचिन वाझे यांनीच माझ्या पतीची हत्या केली आहे. असं तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर फडणवीस यांनी  सचिन वाजे यांना कोण वाचवण्याचा प्रयत्न करतंय?, त्यांना अजूनही अटक का केली नाही? असे अनेक सवाल विचारले आहेत. यानंतर सभागृहात भाजप आणि महाविकास आघाडीतील आमदारांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या-
आश्चर्यंम! बहाद्दरानं जुन्या साडीपासून २ मनिटात बनवली दोरी, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
वेटर म्हणाला डोळे दुखतात, अन् तात्याराव लहानेंनी हॉटेलमध्येचं केली उपचाराला सुरूवात
‘पोलिसांना भेटायला जातो असं सांगून ते गेले, पण परतलेच नाही’
आठवड्याभरातच दीड हजार रुपयांनी सोनं स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा भाव

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.