#ArrestRamdev : फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी; WHO म्हणते…

मुंबई : काही दिवसांपूर्वीच योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला होता. तसेच पतंजलीने करोना विरोधात ‘कोरोनिल’ प्रभावी असून, याला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचा दावा केला. मात्र योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने बनवलेल्या ‘कोरोनिल’ औषधावर वाद निर्माण झाला आहे.

पतांजलीच्या ‘कोरोनिल’ औषधाचं लॉंच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत झाले. त्यामुळे अलोपॅथी डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) याला विरोध दर्शवला आहे. “जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सर्टिफिकीटबाबत धादांत खोटं ऐकून धक्का बसला,” अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी दिली.

दरम्यान WHOनं कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक उपचारांना परवानगी दिलेली नाही तसेच कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट्ही दिलेलं नाही. याबाबतची माहिती पतंजलीनं औषध लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे.

आता जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO दक्षिण पूर्व एशियाच्या रीजनल अधिकाऱ्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. “जागतिक आरोग्य संघटनेने पारंपारिक औषधांचा वापर करुन करोनावर उपचार करण्याच्या कोणत्याही पद्धतीची तपासणी केली नाही किंवा त्याला प्रमाणपत्रही दिलेलं नाही,” असे ट्विट करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे ट्विटरवर #ArrestRamdev हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. बाबा रामदेव यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी अशी मागणी अनेकजण करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने तरी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सोबतच लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हक्क नाही, अशा शब्दात बाबा रामदेव यांना लक्ष करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
खा. डेलकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अनेक महत्त्वाच्या नावांचा उल्लेख? मृत्यू प्रकरणातलं गूढ वाढलं
खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातला गुंता वाढला! पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा…
जयंत पाटलांनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम; महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.