Share

राज ठाकरेंना अटक करा अन्यथा संघर्ष अटळ; ‘या’ संघटनेनेही थोपटले दंड

raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ४ तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर डबल आवाजात हनुमान चालिसा लावू, असं विधान राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलं होतं.(Arrest Raj Thackeray otherwise conflict is inevitable, this organization demand)

या विधानानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली होती. भीम आर्मीने देखील आक्रमक भूमिका घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, नाहीतर त्यांच्यासोबत आमचा संघर्ष अटळ आहे, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे.

भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे जर महाराष्ट्रात दंगली झाल्या, तर आमचा आणि त्यांचा संघर्ष अटळ आहे, असे भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी सांगितले आहे.

औरंगाबादमधील सभा उधळून लावू, असा धमकीवजा इशारा देखील भीम आर्मीने राज ठाकरेंना दिला होता. त्यानंतर पोलिसांनी भीम आर्मीच्या काही कार्यकर्त्याना ताब्यात घेतले होते. आता पुन्हा एकदा भीम आर्मीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे.

या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज सिटी पोलीस चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या अटींचा भंग आणि प्रक्षोभक भाषण केल्याच्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

आज मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईदरम्यान महेंद्र भानुशाली यांच्याजवळ असणारे काही भोंगे देखील जप्त करण्यात आले आहेत. तसेच काही मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कलम १४९ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
पोलिसांकडून मनसे नेत्याचे अटकसत्र सुरु, मुंबईतून ‘या’ बड्या नेत्याला अटक
बायकी टोमणे मारण्यात बाप से बेटा सवाई दिसतोय; चित्रा वाघ यांचा आदित्य ठाकरेंना टोला
ते मला बेशुद्ध करायचे आणि माझ्या देहाचा व्यापार करायचे; पूजा मिश्राचा शत्रुघ्न सिन्हांवर गंभीर आरोप

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now