कोर्टात ह्या १५ मुद्द्यांनी पलटवली केस व अर्णबची रवानगी झाली कोठडीत

अलिबाग | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी घरात गुसून अटक केली. त्यानंतर अलिबागच्या सत्र न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. अर्णब यांच्यासह इतर २ आरोपीसुद्धा १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहेत.

पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायाधीशांसमोर सरकारी वकिलांनी १५ वेगवेगळे युक्तिवाद ठेवले होते. ऐन5 गोस्वामी एक प्रस्थापित निक चॅनेलचे संपादक असून त्यांचा समान्यांवर प्रभाव आहे.

अन्वय नाईक यांची सुसाईड नोट जबानी ग्राह्य धरली जाणार आहे आणि आरोपींच्या कंपन्यांच्या मालकी कागदपत्रे प्राप्त करून घ्यायची आहेत. नाईक यांच्या कंपनीतील साक्षीदारांचा शोध घ्यायचा आहे.

त्यावेळी अर्णब पोलीस कोठडीत असणे गरजेचे आहे कारण साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो. यामध्ये नवीन माहिती मिळाली आहे त्याचा तपास करायचा आहे. यापूर्वीच्या तपासात कोणत्या वेंडर्सकडून कामे आरोपीने पूर्ण करून घेतली याची माहिती नाही.

त्याचा तपास करायचा आहे, त्यांना अटक करायची आहे. काम केल्याची कागदपत्रे जमा करायची आहेत. वर्क ऑर्डरपेक्षा जास्त काम केल्याचे साक्षिदाराचे म्हणणे आहे त्याचाही तपास करायचा आहे.

अन्वय नाईक यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही असा आरोपीचा दावा आहे त्याचाही तपास करायचा आहे. नवीन तपासात काही बँक अकाऊंट नंबर मिळाले आहेत त्यामध्ये अजून काही अकाऊंट आहेत का? बघायचे आहे.

काही साक्षीदारांचे १६४ सीआरपीसी अंतर्गत जबाब नोंदनवायचे आहेत त्यासाठी अर्णबची कोठडी गरजेची आहे. सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट आहेत का? याचा तपास करायचा आहे.

आरोपीने सादर केलेल्या डेबिट नोटवर मयत किंवा त्याच्या कंपनीची सही असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे या एकतर्फी जारी करण्यात आल्या आहेत. मयत व्यक्तीस आत्महत्या करण्यायोग्य परिस्थिती निर्माण केली आणि परिणामी मयत यांनी गळफास लावून आत्महत्या केली याचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची आहे.

मयत यांच्या मुलीला धमक्या देण्यात आल्या त्यांच्या तक्रारीची नोटीस मुंबई पोलिसांनी गोस्वामी यांना बजावली आहे. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांकडून तपासामध्ये कमतरता. प्रक्रिया संहितेचे उल्लंघन याकरणास फिर्यादीने आक्षेप घेतला होता. त्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं आढळले आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

घटस्फोटाच्या आदल्या रात्री मलायकासोबत ह्या धक्कादायक गोष्टी घडल्या होत्या

रोहित शर्मा ठणठणीत असतानाही त्याचं नाव ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून का वगळण्यात आले?

गौतम गंभीर प्रमाणेच रोहित शर्माचीही कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला जातोय?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.