अर्णब गोस्वामींच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार अजूनही आहे कारण…

दिल्ली | अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर बुधवारी अंतरिम जामीन मिळाला. पण अर्णब गोस्वामी यांच्यावर हा एकच गुन्हा दाखल नाहीये.

महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्यावर आणि रिपब्लिक टीव्हीवर तब्बल ६ गुन्हे दाखल केले आहेत. जरी त्यांना आता जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार तशीच आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना सामान्य जामीन मिळाला आहे. याविरोधात पोलिसांनी पुनर्विचार अर्ज दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

जेव्हा अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी पोलीस आले होते तेव्हा त्यांनी अटकेपासून मज्जाव करण्याचा प्रयत्न केला होता. ही ४ नोव्हेंबरची गोष्ट आहे. कलम ३५३ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तसेच टीआरपी घोटाळ्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पैसे देऊन टीआरपी विकत घेतल्याप्रकरणी क्राईम ब्रांचने ऑक्टोबर महिन्यात रिपब्लिक टिव्हीसह आणखी तीन चॅनेलवर गुन्हा दाखल केला आहे.

रिपब्लिक टीव्हीने पैसे देऊन टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. खोट्या बातम्या दाखवून राज्य सरकार, मुंबई पोलीस, कर्मचारी यांच्याविरोधात जाणीवपूर्वक द्वेशाची भावना निर्माण करून मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मालिन केल्याप्रकरणी रिपब्लिक न्यूज चॅनलचे अँकर, संपादकीय कर्मचारी आणि रिपोर्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याने अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली होती.

तसेच कोरोनाच्या काळात बांद्रा स्टेशनबाहेर हजारो परप्रांतीय मजूर जमा झाले होते. आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेनची मागणी करण्यासाठी ते जमले होते. यावर अर्णब गोस्वामी यांनी मुस्लिम समाजावर आरोप लावला होता की, हे मुस्लिम समाजाने रचलेले षडयंत्र होतं. यावर मुस्लिम समुदायाने अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी शिवसेना आमदारांच्या तक्रारीनंतर विधानसभा अध्यक्षांनी अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग नोटीस बजावली होती. यावर अजूनही अर्णब गोस्वामी यांनी उत्तर दिलेले नाही.

महत्वाच्या बातम्या-

तरूण शेतकऱ्याने शेतात मोती पिकवत कमावला तुफान पैसा; मोदींनीही केले कौतुक

प्री-वेडिंग शूटसाठी गेलेल्या जोडप्यावर काळाचा घाला, पोझ देताना नदीत बुडून मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.