आधी प्रतिज्ञापत्र सादर करा, मग पाहू; हक्कभंग प्रकरणी अर्णबला सुप्रीम कोर्टाने फटकारले

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात राज्य विधीमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता. तसेच त्यानंतर गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती.

तसेच या प्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दरम्यान २ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात त्या प्रस्तावावर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र विधानसभेने बजावलेल्या हक्कभंग नोटीशीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश अर्णब गोस्वामी यांना दिले आहेत.

याचबरोबर पुढे कोर्टाने सुनावणी दरम्यान म्हंटले आहे की, ‘सर्व गोष्टी प्रतिज्ञापत्रात लिहा. या याचिकेवर आम्ही शुक्रवारी सुनावणी करू,’ असे सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान सांगितले आहे.

दरम्यान, ही सुनावणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपिठासमोर करण्यात आली. न्यायमूर्ती शरद बोबडेंनी अर्णब गोस्वामी यांनी या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवारी ६ नोव्हेंबरला होईल असा आदेश दिला आहे.

वाचा प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्तावात काय म्हंटले होते?
‘अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासंदर्भात ज्या भाषेचा प्रयोग केला त्याचा मी निषेध करतो. माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. अर्णब यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,’ असं सरनाईक यांनी म्हंटले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या

आता मी भाजपला माझी ताकद दाखवून देतो; नाथाभाऊ कडाडले
भाजपला खिंडार! खडसेंची भाजपवर पहिली ‘सर्जिकल स्ट्राईक’, ६० जण राष्ट्रवादीत दाखल
…तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल- चंद्रकांत पाटील

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.