पुछताँ है भारत म्हणणाऱ्या अर्णबला पुछता है तुरुंगाधिकारी; दोन दिवस फक्त बिस्किटांवर

मुंबई | वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली असून त्याना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोस्वामी कोठडीत रात्री मच्छरांनी झोपू दिलं नाही, कारागृह प्रशासनाने नवे कपडे दिले नाहीत आणि चवीचं जेवण न मिळाल्याने काही खाताही आले नाही. यामुळे त्यांना अस्वस्थ झाले असून त्यांना त्रास होत आहे.

याचबरोबर गोस्वामी यांच्या खोलीत एक पंखा आणि खाट एवढीच सोय आहे. तसेच गोस्वामींना शुक्रवारच्या रात्री डासांनी हैराण करुन सोडल्याची देखील माहिती मिळत आहे. शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता गोस्वामी उठले मात्र त्यांना कारागृहाचं पाणी पसंत नसल्याने त्यांनी अंघोळ न करण्याचा निर्णय घेत्याचे समजत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गोस्वामी यांनी उप कारागृह प्रशासनाकडे मिनरल वॉटरची आणि बाहेरच्या जेवणाची मागणी केली होती. मात्र, त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांना केवळ बिस्कीते खाऊन कारागृहात रात्र काढावी लागली असल्याचे समजतं आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना अलिबाग जेलमध्ये न नेता क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. त्यामुळे अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडी अलिबाग नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

‘तो’ फडणवीस सरकारचाच प्लान होता; कॉंग्रेसने दिले सगळे पुरावे
कोरोनामुळे दिवाळीत चालणारे व्यवसाय ठप्प; व्यावसायिक हवालदिल
पेन्शनधारकांना बँकेत जाण्याची गरज नाही! ऑनलाइन पद्धतीने जमा करा जीवन प्रमाणपत्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.