सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका! अर्णब गोस्वामींना अटकेपासून संरक्षण

मुंबई । अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या कारवाईनंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी विधानसभेने गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली होती. यावरून जोरदार वाद सुरू झाले होते.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. हक्कभंग प्रकरणात गोस्वामी यांना अटक करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून पोलिसांना बुधवारी अटक केली होती.

या अटकेनंतर भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा गोस्वामी न्यायायलात केला. गोस्वामींवरील कारवाईवरुन भाजप महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला लक्ष्य करीत आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे.

गोस्वामी यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर झाली. गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस बजावल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस सरन्यायाधीशांनी बजावली आहे.

दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी भाजप आमदार राम कदम यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.