“अर्णब गोस्वामी बेजबाबदार बातम्या सांगून समाजात तेढ निर्माण करतात, त्यांच्यावर कारवाई करा”

मुंबई । अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरुन पत्रकार अर्णब गोस्वामी वारंवार शिवसेनेला टार्गेट करत आहेत. यावरुन आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे.

त्यांनी अर्णब गोस्वामीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

सावंत यांनी म्हटले आहे की, पत्रकार अर्णब गोस्वामी हे सतत बेजबाबदार बातम्या प्रसारित करत आहेत. कुठल्याही पुराव्याशिवाय राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप लावण्यापर्यंत त्यांच्या चॅनेलची मजल गेली आहे.

यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच एका मृत महिलेबाबत आरोप करताना पत्रकारितेतील सर्व नीतीमत्ता त्यांनी ओलांडली आहे. त्या मृत महिलेची विटंबना आणि चारित्र्यहननाचे पातक त्यांच्याकडून घडले आहे.

गोस्वामी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. काही लोकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गुन्ह्यासंदर्भात विभाजक आणि बेजबाबदार बातम्या खळबळजनक प्रसारित करुन समाजात तेढ निर्माण करुन लोकांना चिथावणी देण्याचे काम करत आहेत.

त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी भीती खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे.

त्यांनी यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण आता चांगलेच तापू लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.