रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अन्वय नाईक प्रकरणानंतर आता रिपब्लिक टीव्हीवरील सर्व गुन्हे मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी याचिकेतून केली होती. त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करावी, अशीही मागणीही गोस्वामी यांनी केली होती. आज या याचिकेवर न्यायमूर्ती जस्टीस चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी झाली.
गोस्वामी यांनी या याचिकेमध्ये सर्व एफआयआर रद्द करावे आणि महाराष्ट्र पोलिसांकडून संपादक आणि इतर कर्मचाऱ्यांना अटक होऊ नये, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी अनैसर्गिक असल्याचे सांगून सुनावणी करण्यास नकार दिला.
“ही याचिका महत्वाकांक्षी स्वरूपाची आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कोणालाही अटक करू नये आणि हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी तुमची इच्छा आहे. ही याचिका तुम्ही मागे घेतलेली बरी,” अशा शब्दात न्या. डी. वाय. चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे वकील मिलिंद साठे यांना सुनावले.
…याला म्हणतात बेहती गंगा मे हाथ धोना, फडणवीसांचा हल्लाबोल
अक्षय खन्नासोबत बॉलीवूडमध्ये लाँच झालेली ‘ही’ अभिनेत्री आज कुठे आहे