खळबळजनक! आ.त्मह.त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. तसेच पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे.

याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचा सांगण्यात येत आहे.

अन्वय नाईक प्रकरण काय आहे?
अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तसेच तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.

तसेच अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या
माश्याचा काटा घशात अडकल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय; १ मिनिटात निघून जाईल काटा
विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात पडलेल्या पोरीला शक्ती कपूरने घरातून फरफटत आणले होते
दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.