अर्णब प्रकरणी उत्तर देताना चंद्रकांत पाटील आले अरे- तुरे वर, शेवटी मागावी लागली पत्रकारांची माफी

मुंबई । अर्णब गोस्वामी प्रकरणी सध्या राजकारण पेटले आहे. यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप सुरु आहेत. या प्रकरणावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काही प्रश्न विचारण्यात आले यावर ते चांगलेच संतापले.

कोणत्याही पत्रकार संघटनेने अर्णब गोस्वामी प्रकरणात बाजू घेतली नाही. परंतु भाजप त्यांची बाजू का घेत आहे? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. यावर संतप्त झालेल्या पाटील यांनी पत्रकारांनाच ‘अरे-तुरे’ च्या भाषेत उत्तर दिले. यावरुन मोठा गोंधळ झाला. त्यामुळे संतापलेल्या सर्व पत्रकारांनी प्रथम माफी मागा असे त्यांना सुनावले.

या गोंधळामुळे अखेर पाटील यांनी पत्रकारांची माफी मागितली. सोबतच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना उच्च न्यायालयाने जमीन दिला असतांना भाजप आंदोलन का करीत आहे? असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर देखील पाटील संतापले.

या प्रश्नाचे उत्तर पाटील देऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी अवघ्या 10 मिनिटात पत्रकारांची माफी मागून काढता पाय घेतला. ‘आपण वयाने मोठे असल्यामुळेच पत्रकारांसोबत अरे-कारेच्या भाषेत बोललो’ अशी सावरा सारव त्यांनी केली. मात्र या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील गोंधळुन गेले होते.

यावेळी त्यांच्यासोबत धामणगाव रेल्वेचे आ. प्रताप अडसड बसले होते. त्यांच्यावर सुध्दा 420 चा गुन्हा दाखल आहे. तसेच भातकुलीचे तालुकाध्यक्ष यांच्यावर सुध्दा बलात्काराचा गुन्हा आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.