झोप लागत नसेल तर आर्मीची ‘ही’ ट्रीक वापरा, २ मिनिटांत झोप येईल

अनेकांना रात्री झोप येत नाही. अनेकजण २ ते ३ वाजेपर्यंत जागेच असतात. मनात कसलेही विचार नसले किंवा चिंता नसली तरी लोकांना झोप लागत नाही. ते नेहमी वळवळ करत असतात. यामुळे शेजारी झोपणाऱ्या लोकांची झोपमोड होते.

झोप येत नाही म्हणून काही लोक मोबाईल घेऊन बसतात. झोप येण्यासाठी काही लोक झोपेच्या गोळ्याही खातात तसेत उलटे आकडे मोजणे किंवा गाणी ऐकणे. एवढे सगळे उपायही करूनही झोप येत नसेल तर अशावेळी आर्मीची ट्रीक वापरून पहा.

आर्मीतील जवान ही ट्रीक वापरून २ मिनिटांत झोपी जातात. एका पुस्तकामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकात अमरिकी सैनिकांच्या अनेक ट्रिक्स सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये असाही दावा करण्यात आला आहे की १२० सेकंदात कोणीही झोपी जाऊ शकतो.

हे पुस्तक १९८१ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. २०११ मध्ये झालेल्या एका सर्व्हेमध्ये असे समोर आले की ब्रिटनचा प्रत्येक तिसरा नागरिक झोप न येण्यामुळे त्रस्त आहे. याचे कारण मद्याचे सेवन, चिंता, डिप्रेशन, निकोटीन हे आहे.

वरिष्ठांना ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. जर झोप योग्य वेळी झाली नाही तर डायबेटीज, ह्रद्यरोग यांसारखे गंभीर आजार होतात. झोप येण्यासाठी तुम्हाला आम्ही आर्मीची ट्रीक सांगणार आहोत. ती ट्रीक अशी आहे की, सर्वात आधी चेहऱ्यावरील मसल्ससोबत जीभ, जबडा आणि डोळ्यांना रिलॅक्स करा.

खांदे एकदम ढिल्ले सोडा. त्यांना खालच्या बाजूने झुकू द्या. एवढे केल्यानंतर श्वास सोडा. छातील व पायांना रिलॅक्स सोडा. तुमचे शरीर १० सेकंदासाठी रिलॅक्स सोडले की मनातील सगळे विचार काढून टाका. विचार करणे आधी बंद करा.

असा विचार करा की तुमच्या डोक्यावर निळे आकाश आहे आणि समोर शांत धबधबा. किंवा १० सेकंद विचार करू नको असे मनात ठरवा. असे केल्याने झोप येऊ शकते. एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे.

जर झोप आली नाही तरीही ही ट्रिक करत राहा. तुम्हाला नक्की झोप येईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या फेसबूक पेजला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या
खुशखबर! वाहनाच्या नव्या पॉलिसीमुळे वाहननिर्मितीला मिळणार चालना
‘मक्कडी’ चित्रपटातील अभिनेत्रीने केले स्वीकार; म्हणाली, मी पैशांसाठी देहविक्री करत होते पण नंतर मात्र….
‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्री झाली होती घरेलू हिंसाचाराची शिकार; स्वत: केला होता ‘हा’ मोठा खुलासा
सत्तेवर आल्यापासूनची मोदी सरकारची सर्वात खराब कामगिरी; ७२ टक्के जनता म्हणतेय…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.