साताऱ्याचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये आले वीरमरण; १० महिन्यांची चिमुरडी झाली पोरकी

लडाख येथे नेमणूक करण्यात आलेल्या साताऱ्याचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आले आहे. हवामानातील बदलांमुळे त्यांना श्वासोश्वास घ्यायला अडचण होत होती. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे.

सोमनाथ मांढरे हे वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र होते. सोमनाथा मांढरे यांच्या वीरमरणाची माहिती कुटुंबाला संध्याकाळी मिळाली आहे. देश सेवा करत असताना अतिशय प्रतिकुल परिस्थितीत वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीरमरण आले आहे.

सोमनाथ मांढरे यांना वीरमरण असल्याची माहिती मांढरे कुटुंबाला मिळताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोमनाथ यांच्या जाण्याने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे.

सोमनाथ मांढरे यांच्यामागे त्यांची पत्नी आठ वर्षांचा मुलगा आणि फक्त १० महिन्यांची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. वीरमरण आलेल्या सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव आत दिल्लीत पोहचणार आहे. त्यानंतर हे पार्थिव संध्याकाळपर्यंत आसले गावापर्यंत पोहचणार आहे.

शुक्रवारी पहाटेपासून लडाख प्रदेशात त्यांची नेमणूक करण्यात आली होती. कर्तव्यावर असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. तिथल्या हवामान बदलांमुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण होऊ लागली होती. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

निलेश राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका, म्हणाले, ‘तु जिथे गेलास तिथे शिवसेनेचं तोंड काळं झालं’
मोठी बातमी! परमबीर सिंह बेपत्ता, नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता
फोनवर बोलण्यासाठी बाईक थांबवली अन् घात झाला; क्षणात होत्याचे नव्हते झाले! सांगा चूकी कुणाची?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.