सासरे वारलेत, घरी कोणच नाही, प्लिज अंत्यसंस्कार करा; लेफ्टनंट कर्नलचा कश्मीरमधून पोलीसांना फोन

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैनाम घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. अनेक रुग्णांचा मृत्यु होत आहे. अशा परिस्थितीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना पण खुप अडचणी येत असल्याच्या घटना घडत आहे.

या परिस्थितीत लष्करांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या नातेवाईकांचा अंतिम संस्कार करणे शक्य होत नाहीये. त्यामुळे ते पोलिसांना फोन करुन मदतीची विनंती करताना दिसून येत आहे.

अशीच एक घटना आता पुन्हा घडली आहे. लेह लडाखमध्ये कार्यरत असलेल्या लेफ्टिनंट कर्नल एस मंडल यांच्या दिल्लीमध्ये राहणाऱ्या सासऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांनी सासऱ्यांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्ली पोलिसांची मदत मागितली आहे

एस मंडल हे दिल्लीत येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी द्वारकाचे डिसीपी संतोष कुमार मीणा यांच्याशी संपर्क साधला आहे आणि सासऱ्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी मदत मागितली.

त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घातली. त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करत प्रथेनुसार एस मंडल यांच्या सासऱ्यांवर अंत्यसंस्कार केले आहे.

दरम्यान, पोलिस अशावेळी सामान्य नागरीकांच्याही मदतीला धावून येत आहे. सेक्टर ७ अपार्टमेंटमधून पोलिसांना माहिती मिळाली होती, की जय मथानी येथे राहणाऱ्या एका महिलेला कोरोना लागण झाल्याने तिचा मृत्यु झाला आहे. पण तिच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी कोणी घेत नाही. त्यावेळी पोलिस कर्मचारी बलबीर सिंग आणि त्यांच्या टीमने मिळून त्या महिलेवर अंत्यसंस्कार केले होते.

महत्वाच्या बातम्या-

मदतीचा ओघ सुरू! दीड लाख अधिकाऱ्यांचा २ दिवसांचा ५० कोटी रूपये पगार मुख्यमंत्री निधीला
वर्दीला सलाम! धावत्या ट्रेनमध्ये जीव धोक्यात घालत पोलिसाने वाचवला लटकलेल्या प्रवाशाचा जीव; पहा थरारक व्हिडीओ
दुबईच्या खोलीमधून नेहाचा हनिमूनचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मिडीयावर धुरळा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.