आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. मुंबई इंडियन्सने ९ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) संघ शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे आयपीएलच्या उपांत्य फेरीत पोहचण्याचा मुंबई इंडियन्स संघाच्या आशा मावळल्या आहेत.(Arjun Tendulkar will get a chance in today’s match)
त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये संघातील नवीन खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षी मुंबईने दक्षिण आफ्रिकेतील डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, हृतिक शोकीन आणि कुमार कार्तिकेय यांसारख्या युवा प्रतिभांना पदार्पण करण्याची संधी दिली होती. आता गुजरात विरुद्धच्या आगामी सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी दिली जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. हा सामना ६ मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी अर्जुनच्या पदार्पणाशी संबंधित वक्तव्य केलं आहे. संघातील अर्जुन सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असेल तर आम्ही त्याला नक्कीच संधी देऊ, असे महेला जयवर्धने यांनी सांगितले आहे.
पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांना अर्जुनच्या पदार्पणाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना महेला जयवर्धने म्हणाले की, “ठीक आहे, मला वाटते की संघातील प्रत्येक खेळाडूला पर्याय असतो. गोष्टी कशा पद्धतीने पुढे जातात ते आपण पाहू. हे सामन्याबद्दल आहे आम्ही सामना कसा जिंकू शकतो, याकडे आमचे प्राधान्य असणार आहे.”
मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने पुढे म्हणाले की, “खेळात एक आत्मविश्वास असतो. आम्ही आमचा पहिला विजय मिळवण्यात यशस्वी झालो. आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी हा विजय महत्वाचा आहे. पुढील सामन्यांमध्ये संघाच्या सर्वोत्तम खेळाडूंना संधी मिळणार आहे. अर्जुन त्यापैकी एक असेल तर आपण विचार करू. पण हे सर्व संघ संयोजनावर अवलंबून आहे”, असे महेला जयवर्धने यांनी सांगितले आहे.
२२ वर्षीय अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग आहे. अर्जुन गेल्या मोसमापासून पदार्पणाची वाट पाहत आहे. पण अद्याप त्याला संधी मिळालेली नाही. २०२१ मध्ये लिलावात मुंबई इंडियन्स संघाने ३० लाख रुपयांत अर्जुन तेंडुलकरला संघात सामील करून घेतले होते. अर्जुन तेंडुलकर हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा आहे.
महत्वाच्या बातम्या :-
या शुक्रवारी रिलीज होणार ‘हे’ सुपरहिट चित्रपट, थ्रिल, रोमान्स आणि देशभक्तीचा लागणार तडका
जेलवारी वाईटच, प्रचंड त्रास होतोच, आणि मानसिक खच्चीकरण…; रुपाली पाटलांची राणा दाम्पत्यावर खास पोस्ट
कळव्यातील मुस्लिम बांधवांनी घालून दिला नवा आदर्श; स्वत:च उतरवले मशिदीवरील भोंगे