सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा  IPL खेळणार; कमीत कमी ‘इतके’ लाख तरी मिळणारच

मुंबई | यंदाच्या आयपीएल लिलावासाठी खेळाडूंच्या नावांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. या लिलावात भारताचा स्टार खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा समावेश झाला आहे. आयपीएल लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइज (मुळ किंमत) ठरली आहे.

२०२१ च्या आयपीएल लिलावासाठी ८१३ भारतीय आणि ८३ परदेशी अशा एकूण १०८७ खेळाडूंचे नामांकन केले आहे.  यामध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. या लिलावासीठी अर्जुनची मुळ किंमत ठरवण्यात आली आहे. या किंमतीपासून अर्जुनचा लिलाव होण्यास सुरुवात होईल.

लिलावासाठी अर्जुनची बेस प्राइज (मुळ किंमत) वीस लाख रुपये ठेवली आहे. या किंमतीच्या वर त्याची बोली लागेल. तसेच संघानी त्याला खरेदी करण्यास नापसंती दिल्यास कमीत-कमी बेस प्राइजवर म्हणजेच वीस लाखांमध्ये संघ त्याला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेऊ शकतात.

तसेच, आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्या प्रकरणी ७ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर एस. श्रीसंतचा देखील यंदाच्या आयपीएल लिलावात समावेश करण्यात आला आहे. श्रिसंतची ७५ लाख इतकी बेस प्राइज ठेवण्यात आली आहे. तर कोसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची नवी वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारची बेस प्राइज ५० लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकर, विराट कोहली मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात
विराट आणि अजिंक्यमध्ये कर्णधारपदासाठी टक्कर? अजिंक्यने दिलेले उत्तर वाचून कौतुक कराल  
‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील अंगूरी भाभीचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल
रिहानाचा आणि ख्रिस गेलचा ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ झाला व्हायरल, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.