गोलंदाजीतही सरस आणि फलंदाजीतही सरस, आयपीएल लिलावाआधीच अर्जुन तेंडुलकरने केला धमाका

आयपीएलचा नवीन सीजन लवकरच सुरू होणार आहे. या सीजनची तयारीही सुरू झाली आहे. त्याची लिलाव प्रक्रिया १८ फेब्रुवारीला पार पडणार आहे. या लिलावात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती सचिन तेंडुलकरच्या मुलाची.

त्याला या लिलावात किती बोली लागेल यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. अर्जुन तेंडुलकरने या लिलावात आपली नोंदणी केली आहे. सध्या त्याची मुळ किंमत २० लाख रूपये आहे. त्याला कोणता संघ विकत घेईल हे आता आपल्याला लिलावातच कळेल.

पण लिलावाच्या आधीच त्याने धमाकेदार कामगिरी पार पाडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. १४ फेब्रुवारीला पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतमध्ये अ गटाच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अर्जुन तेंडुलकरने धमाकेदार खेळी करत सगळ्यांनाच धक्का दिला.

त्याने ३१ चेंडूत ७७ धावा करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. एवढच काय तर त्याने गोलंदाजी करत ३ बळीही घेतले. त्याने ३१ चेंडूंचा सामना करत पाच चौकार आणि आठ षटकार मारले. त्याने फिरकीपटू हाशिर दाफेदार याच्या एक ओव्हरमध्ये पाच षटकार लगावले.

अर्जुन तेंडूलकरच्या या आक्रमक खेळीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने पोलीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत इस्लाम जिमखान्याचा ११४ धावांनी पराभव केला. एमायजीने ४५ ओव्हरमध्ये ३८७ धावा केल्या होत्या. त्यांचे ७ गडी बाद झाले होते. एमायजीचे ३८७ धावांचे लक्ष त्यांना पार करता आले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.

महत्वाच्या बातम्या
अमित शहा नेपाळ व श्रीलंकेतही भाजपचे सरकार आणणार आहेत; भाजप मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे
गायीचं शेण ५ रूपये किलोने विकत घेणार; गडकरींची मोठी घोषणा
नरेंद्र मोदी आईला भेटताना आम्हाला जवळ येऊ देत नाहीत; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
फोनचा पासवर्ड विसरलात? ‘या’ काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून क्षणात करा अनलॉक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.