“त्याच्या उत्साहाचा खून करू नका” अर्जुन तेंडुलकरसाठी बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी मैदानात

मुंबई | भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडूलकर आयपीएलच्या १४ व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार आहे. त्याला २० लाख रूपयांत मुंबई इंडियन्सकडून खरेदी करण्यात आले आहे.

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत असल्याने चाहत्यांचे अर्जूनच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिले आहे. तसेच अर्जूनच्या निवडीवर काहींनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

अर्जूनला ट्रोल केल्यानंतर मदतीला त्याची बहिण सारा तॆंडूलकर आली होती. तिने ट्रोलर्सना कडक शब्दांत उत्तर दिलं होतं. साराबरोबरचं अभिनेता फरहान अख्तरही अर्जूनच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यानेही ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

 

 

ट्विटरवर फरहान अख्तरने पोस्ट शेअर करत म्हटले की, ‘मला असे वाटते की मी अर्जून तेंडूलकरबद्दल बोलाव. आम्ही एकाच ठिकाणी जिमला जातो. तो फिटनेससाठी किती कठोर परिश्रम घेतो हे मी पाहिलं आहे. एक चांगला क्रिकेटपटू असल्याचं त्याचं लक्षण आहे’.

पुढे म्हणाला की, अर्जूनवर नेपोटिझम शब्द लादणं फार चुकीचं आणि क्रूर आहे. सुरू होण्याआधीच त्याच्या उत्साहाचा खून करू नका. त्याला ट्रोल करणं बंद करा. असं म्हणतं फराह अख्तरने ट्रोलर्सना सूनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघात निवड झाल्यानंतर सूर्यकुमारला भावना अनावर; म्हणाला, विश्वास बसत नाहिये पण…
सौरभ गांगुलीच्या पत्नीने दिली पोलीसांत तक्रार; पुर्ण प्रकरण जाणून घ्या
विराटच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या अनुष्काने ‘तो’ फोटो शेअर करत , म्हणाली….

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.