Share

Arjun Rampal: पत्नीला घटस्फोट देऊन १५ वर्षांनी लहान मॉडेलसोबत केलं लग्न, आता आहे अविवाहित बाप

Arjun-Rampal

अर्जुन रामपाल(Arjun Rampal): बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये होणाऱ्या किस्यांची कमतरता नाही. कलाकारांचे रोज ब्रेकअप-पॅच-अप होतच असतात. दरम्यान, आम्ही तुम्हाला एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने आधी स्वतःहून मोठ्या मॉडेलशी लग्न केले आणि हे लग्न २० वर्षे निभावले, पण त्यानंतर या अभिनेत्याला स्वतःहून १५ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीवर प्रेम झाले.(Arjun Rampal, Marriage, Meher Jessia, Gabriella Demetreds, Live In)

अभिनेता त्या अभिनेत्रीसोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागला आणि नंतर त्या रिलेशनशिपनंतर तो अविवाहित पिताही बनला. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपालबद्दल. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने आपल्या फिल्मी करिअरमध्ये फार कमी चित्रपट केले आहेत आणि निवडक चित्रपट करूनही अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

अर्जुन त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जितका प्रसिद्ध आहे तितका तो त्याच्या अभिनयासाठी नाही. अर्जुन रामपालने लाखो अभिनेत्रींना आपल्या लूकने वेड लावले. पण जेव्हा तो यशस्वी अभिनेताही झाला नव्हता, तेव्हा तो स्वत:हून काही वर्षांनी मोठा सुपरमॉडेल आणि माजी मिस इंडिया मेहर जेसियासोबत लग्न केले होते.

या अभिनेत्याने १९९८ मध्ये मेहर जेसियाशी लग्न केले. त्यानंतर अर्जुन मायरा आणि माहिका या दोन सुंदर मुलींचा बाप बनला पण अर्जुन रामपालचे हे लग्न केवळ २० वर्षे टिकले आणि त्यानंतर दोघांनीही आपले मार्ग वेगळे केले. मेहरशी घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रेड्सच्या प्रेमात पडला.

त्यानंतर दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. या नात्यानंतर लवकरच गॅब्रिएला अर्जुनच्या मुलाची आई झाली, ज्याचे नाव एरिक आहे. पण खास गोष्ट म्हणजे गॅब्रिएला आणि अर्जुनचे लग्न झालेले नाही. गॅब्रिएलासोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर अर्जुन रामपाल क्वचितच दिसला, परंतु तो त्याच्या सोशल मीडियावर सक्रिय राहतो.

त्याच्या इंस्टाग्रामवर एक नजर टाकली तर लक्षात येईल की अर्जुन त्याच्या मुलांवर किती प्रेम करतो. दररोज कलाकार त्याच्या मुली आणि मुलासोबत फिरायला जातो. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो शेवटचा ‘धाकड’ चित्रपटात दिसला होता पण हा चित्रपट पडद्यावर फ्लॉप ठरला. यानंतर तो ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच तो ‘नास्तिक’ चित्रपटाचे शूटिंगही करत आहे.

महत्वाच्या बातम्या
Pravin Darekar: ‘मविआ’ला आणखी एक धक्का; दरेकरांची अजितदादा आणि आदित्य ठाकरेंना एकाचवेळी धोबीपछाड
सर्पदंशाने झाला होता भावाचा मृत्यू, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या दुसऱ्या भावाचाही सर्पदंशानेच मृत्यू
Uddhav Thackeray: आदित्य ठाकरेंची जागा घेणार तेजस ठाकरे; उद्धव ठाकरे खेळणार नवा डाव

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now