अर्जुन कपूरने सांगितले आई वडिलांच्या घटस्फोटाचे दुःख; म्हणाला, सोळाव्या वर्षी १५० वजन झाले

बॉलीवूडचा इश्कजादे अर्जून कपूर त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असतो. त्याने २०१२ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. त्यानंतर त्याने मागे वळून न बघता. एका पेक्षा एक हिट चित्रपट केले.

सध्या अर्जून कपूरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर भलेही हिट होत नसतील. पण तो मात्र हिट अभिनेता मानला जातो. अर्जून सध्या मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांचे नाते सगळ्या बॉलीवूडसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

त्यासोबतच आणखी एका गोष्टीमूळे सध्या चर्चेत आला आहे. तो विषय म्हणजे त्याचे वजन.अर्जुनने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे की,
वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचे वजन १५० होते. त्याचे कारण म्हणजे आई वडिलांचे वेगळे होणे.

एका मुलाखतीमध्ये त्याला तुला खायला आवडत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अर्जून म्हणाला की, ‘हो खायला मला खुपच आवडते. म्हणून वयाच्या सोळाव्या वर्षी माझे वजन १५० किलो झाले होते. वजन वाढल्यामुळे मला खुप अडचणींचा सामना करावा लागला होता’.

माझ्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी मी जेवणात सुख आणि शांती शोधायचो. आईला वाटायचे मी लहान आहे. हेच वय आहे माझे खाण्याचे म्हणून ती मला काहीही बोलत नव्हती. पण खुप खाणे चांगले नाही.

अर्जून बोनी कपूर आणि मोना कपूरचा मुलगा आहे. पण बोनी कपूरच्या आयुष्यात श्रीदेवीची एन्ट्री झाली आणि अर्जूनचे कुटुंब तुटले. बोनी आणि श्रीदेवी एका चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. श्रीदेवीला पाहताच क्षणी बोनी तिच्या प्रेमात पडले होते.

सुरुवातीला श्रीदेवीने बोनीकडे लक्ष दिले नाही. पण नंतर मात्र त्या बोनी कपूरच्या प्रेमात पडल्या. दोघांच्या नात्याच्या चर्चा सगळीकडे होऊ लागली होती. पण ही गोष्ट बोनीच्या घरी समजताच अडचणी निर्माण झाल्या. त्यांच्या घरी हे नातं मान्य नव्हते.

पण बोनी कपूर मात्र श्रीदेवीच्या प्रेमात पागल झाले होते. त्यांनी श्रीदेवीसोबत लग्न करण्यासाठी मोना कपूरला सोडण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट छोट्या अर्जूनला आवडली नाही आणि आजारी पडू लागला. यातून बाहेर पडण्यासाठी त्याने वेगवेगळ्या गोष्टी खायला सुरुवात केली. ज्यामुळे त्याचे वजन खूप वाढले.

महत्वाच्या बातम्या –
‘या’ आहेत बॉलीवूडच्या सर्वात कमी शिकलेल्या अभिनेत्री; एक तर आहे फक्त पाचवी पास
अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज, हॉटस्टार बरोबर पण केलाय सौदा पक्का
पतीला सोडून मी दुसऱ्या पुरुषासोबत रिलेशनमध्ये आहे पण…; अभिनेत्रीचा खुलेआम गौप्यस्फोट
इरफान खानला झाला होता मृत्यूचा पुर्वाआभास; मुलाने केला खुलासा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.