मी माझ्या वडिलांचा आदर करतो, पण त्यांनी दुसरे लग्न करुन योग्य केले असे मी म्हणणार नाही, कारण…- अर्जून कपुर

अभिनेता अर्जुन कपुर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्यातले नाते कधीही आतापर्यंत चांगले दिसलेले नाहीये. त्यांच्या नात्यात खुप दुरावा होता, हे अनेकदा दिसून आले होते. श्रीदेवी अर्जून कपुरची सावत्र आई होती.

बॉलिवूचे प्रसिद्ध प्रोड्युसर बोनी कपुर यांनी १९८३ मध्ये मोना शोरीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर त्यांना दोनच वर्षात त्यांचा मुलगा अर्जुनचा जन्म झाला. त्यानंतर पाच वर्षांनी अंशुला जन्मली होती. पण अर्जुन ११ वर्षाचा पण पुर्ण झाला नसेल, तोपर्यंत बोनी आणि मोना यांच्या घटस्फोट झाला.

त्यानंतर बोनी कपुरने श्रीदेवीसोबत लग्न केले. आज मोना जगात नसली तरी पण अर्जुनला सारखी त्याच्या आईची आठवण येत असते. त्याने कधीच श्रीदेवीला आई म्हणून स्विकारले नव्हते. पण तरीही अर्जून श्रीदेवीच्या मृत्युनंतर वडिलांच्या आणि जान्हवी, खुशी या सावत्र बहिणींच्या पाठिशी खंबीरपणे उभा होता.

आजपर्यंत अनेकदा अर्जूनला त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारले गेल होते. पण त्याने कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. आता त्याने एक मुलाखत दिली असून पहिल्यांदाच त्याने वडिलांच्या नात्याबद्दल बोलला आहे.

प्रेम ही भावना खुप कॉम्पलिकेटेड आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असताना तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतात. हे शक्य आहे. पण माझ्या वडिलांनी जे केले ते योग्य होते, असे मी म्हणणार नाही. त्यांच्या या निर्णयाचा माझ्या आयुष्यावर खुप परीणाम झाला आहे. पण आता मोठा झाल्यावर या गोष्टी समजू शकतो, असे अर्जूनने म्हटले आहे.

काही होवो नेहमी वडिलांसोबत रहा असे आईने मला सांगितले होते. माझ्या वडिलांनी जो काही निर्णय घेतला, तो प्रेमात घेतला. त्यांचा मी आदर करतो. त्यांच्या प्रेमाचा आदर करतो. पण प्रेम एकदाच होते, असे म्हणणे आजच्या काळात मुर्खपणाचे ठरेल, असेही अर्जूनने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.