दोस्तीसाठी कायपण! मित्राच्या आईसाठी ४२० किलोमीटरचा प्रवास करुन फक्त ८ तासात पोहचवले रेमडेसिवीर

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसाला ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहे. अशात रुग्णालयात औषधांचा, ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

अशा परिस्थितीत अनेक नातेवाईक दुर जाताना पण अनेक लोक मदतीला धावून येताना पण दिसत आहे. आता एक मित्रच मित्राच्या मदतीला धावून आला आहे. दोस्तीसाठी काहीपण म्हणत मित्राच्या आईसाठी एका मित्राने ४२० किलोमीटर प्रवास करुन रेमडेसिवीर इंजेक्शन आणून दिले आहे.

अर्जून बाली असे संबंधित तरुणाचे आहे. त्याने रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यासाठी चंदीगड ते अवलर असा ४२० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ८ तासात दुचाकीने पुर्ण केला आहे. त्याने हे सर्व आपल्या मैत्रीसाठी केले आहे.

अवलर येथे राहणारे साहिल आणि अर्जून हे पंजाब विद्यापीठात एकत्र शिक्षण घेत होते. साहिलच्या आईला काही दिवसांपुर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर साहिलच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असाताना आईची पातळी अचानक खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने काही औषधं आणायला सांगितली. तसेच रेमडेसिवीर पण आणण्यास सांगितले.

साहिलने खुप शोध घेतला पण रेमडेसिवीर औषध मिळाले नाही. ही गोष्ट जेव्हा अर्जूनला कळाली. तेव्हा त्याने कसलाही विचार करता चंदीगडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन शोधले. त्यानंतर त्याने दुचाकीने तब्बल ४२० किलोमीटरचा प्रवास ८ तासात पुर्ण करत साहिलपर्यंत इंजेक्शन पोहचवले आहे.

आपल्या मित्राच्या आईसाठी कुठलाही विचार न करता त्याने इतका लांबचा प्रवास फक्त ८ तासात पुर्ण करुन इंजेक्शन पोहचवले आहे. त्यामुळे सगळीकडून त्याचे कौतूक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: अजबंच! कुत्र्याने केला महिलांसोबत व्यायाम; त्याचा व्यायाम पाहून नेटकरी पण झाले हैराण
सलाम! सफाई कर्मचाऱ्यांची वाट न बघता मंत्र्याने स्वत:च्या हाताने पुसली कोरोना वार्डाची फरशी
देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा; १० दिवस व्हेंटिलेटरवर राहून हरवले कोरोनाला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.