Share

Satara : आता राजेच राजांचा कडेलोट करणार? साताऱ्याच्या दोन्ही राजांमधील चिघळलेला वाद पोहचला कडेलोटापर्यंत

Satara

Satara : साताऱ्याच्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद सर्वांना माहित आहे. सातारा महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ आल्याने त्यांचे सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यातच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर टीका केल्या आहेत.

सातारा महानगरपालिकेत सध्या उदयनराजे भोसले यांची सत्ता आहे. त्यामुळे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांची सत्ता खाली आणणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

साताऱ्यात पालिकेच्या निवडणुकीमध्ये सातारकर उदयनराजेंना धक्का देणार आहेत. तसेच सातारा पालिकेतून त्यांचा कडेलोट होणार असल्याची टीका शिवेंद्रराजे यांनी केली आहे. बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर ते भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती. या टीकेला आता शिवेंद्रराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले होते की, माझ्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप केला जात आहे. जर मी पैसे खाल्ले असते तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवलं असतं का?, असा सवाल त्यांनी केला होता. तसेच तुम्ही ठिकाण निवडा जर मी पैसे खाल्ले हे सिद्ध झाले तर अजिंक्यताऱ्याच्या कडेलोटवर जाऊन मी उडी मारेन. अन्यथा ज्यांनी आरोप केलेत त्यांनी उडी मारावी, असे आवाहन खासदार उदयनराजे यांनी केले होते.

आता शिवेंद्रराजेंनी याला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, उदयनराजे कोणाचा कडेलोट करतील की नाही हे माहित नाही, पण आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत उदयनराजेंच्या आघाडीला सातारकर धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच सातारा विकास आघाडीचे राजकारण संपुष्टात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

जुनी नगरपालिका इमारत सुस्थितीत असताना त्यासाठी ७० कोटी रुपये का खर्च केले? तसेच जुन्या इमारतीतून कारभार करताना काय दिवे लावले?, असा सवालही शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला आहे. त्यांना ५० नगरसेवक निवडून आणण्याची गॅरंटी आहे, तर ते का घाबरत आहेत. तसेच यावेळी सातारकर त्यांच्या आघाडीचा १०० टक्के कडेलोट करणार आहेत असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, त्यांचा मुंबई दौरा त्यांच्या मनाप्रमाणे झालेला नसावा त्यामुळे ते माझ्यावर चिडून बोलले आहेत. एरवी ते कुचकेपणाने बोलत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परंतु, मला काहीच फरक पडत नाही. विधानसभेला त्यांचा पराभव करुन १० हजाराच्या मताधिक्याने निवडून येत मी आमदारकी मिळवली आहे, असे ते म्हणाले. तसेच यातून त्यांचा बालिशपणा दिसून येतो, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
Vani: तब्बल २ हजार किलोचा शेंदूर हटवला, समोर आले सप्तशृंगी देवीचे मूळ रूप; फोटो पाहून भारावून जाल
Nashik: नाशिकमधील ७ लहान मुले गायब, खरी माहितीसमोर येताच पोलिसांसहीत सगळेच हादरले
चार दिवस अतिवृष्टी; राज्यात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा हवामान खात्याचा अंदाज
Bundelkhand: दुकानदाराने समोसा सोबत प्लेट, चमचा दिला नाही म्हणून पठ्याने थेट मुख्यमंत्र्यांना लावला फोन, म्हणाला..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now