पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी नाहीयेत का? भाजपचा राऊतांना सवाल

मुंबई। शिवसेना नेते संजय राऊत हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. ते राजकारणातील प्रत्येक विषयांवर आपली प्रतिक्रिया देत असतात. अशातच आता संजय राऊत यांनी बेळगाव महापालिका निवडणुकीवरुन जोरदार टीका केली होती व आता याच टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी माणसं वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत, म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस?” असा सवाल पडळकर यांनी विचारला आहे.

‘दिल्लीतील युवराजांना खुश करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठीजनांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुकशाहीचा वापर केला. वारकऱ्यांच्या खांद्यावरुन भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथून पुढेही भोगावा लागणार आहे,’ अशी घणाघाती टीका पडळकरांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तान आणि कलम 370चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाहीतर अखंड भारताला समजले आहे असे पडळकर म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते संजय राऊत?
बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. महाराष्ट्रातील 69 लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता व आता त्याचं टीकेला पडळकरांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
पैसे खूप खर्च होत आहेत? जाणून घ्या, पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग… 
जगातील अशी ६ ठिकाणं जिथे कधीच होत नाही अंधार; रात्रीच्या १२ वाजताही चमकत असतो सुर्य 
तुरुंगात असणाऱ्या नेत्यासह त्याच्या पत्नीला ओवैसींनी एमआयएममध्ये घेतलं; विरोधकांनी टीका करताच दिलं ‘हे’ उत्तर 
‘या’ कारणामुळे अजय व काजोल देवगणच्या मुलीला जावं लागलं परदेशी; काजोलने सांगितलं यामागचं धक्कादायक सत्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.