Share

‘या’ मुस्लिम देशात पुरातत्वशास्त्रज्ञांना मकबऱ्याजवळ सापडले प्राचीन हिंदू मंदिर; पाहणारेही झाले थक्क

तुर्कस्तानमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना प्राचीन किल्ल्याच्या उत्खननात एक मंदिर सापडले आहे. या मंदिराचा संबंध राजा मेनुआशी सांगितला जात आहे. हे मंदिर ज्या प्राचीन किल्ल्यामध्ये आढळते, तो पूर्व तुर्कीच्या वान जिल्ह्यात येतो. तथापि, पुरातत्वशास्त्रज्ञांना सापडलेले राजा मिनुआशी संबंधित हे पहिले मंदिर नाही. या आधीही एक मंदिर सापडले आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञ उत्खनन करत असलेल्या प्राचीन किल्ल्याचे आधुनिक तुर्की नाव ‘Körzüt’ आहे, जो इसवी सन पूर्व आठव्या शतकात बांधला गेला होता. हा किल्ला राजा मिनुआ याने बांधला होता. व्हॅन म्युझियमने किल्ल्यातील उत्खननादरम्यान अनेक महत्त्वाचे शोध लावले आहेत.

तुर्कस्तानच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाच्या परवानगीनंतर किल्ल्यातील उत्खननाचे काम सुरू करण्यात आले, ते अद्यापही सुरू आहे. या पुरातत्व उत्खननासाठी तुर्की सरकारकडून निधीही दिला जात आहे. किल्ल्यातील हे उत्खनन व्हॅन युझुनकू यिल विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाचे प्राध्यापक सबाहत्तीन अर्दोआन यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे.

विशेष बाब म्हणजे किल्ल्याच्या आत सापडलेले हे मंदिर कॉर्बेलिंग तंत्राने बांधले गेले आहे, ज्यामध्ये मातीची भांडी आणि धातूच्या कलाकृती देखील सापडल्या आहेत. या पुरातत्व उत्खननासाठी तुर्की सरकारकडून निधीही दिला जात आहे. किल्ल्यातील हे उत्खनन व्हॅन युझुनकू यिल विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाचे प्राध्यापक सबाहत्तीन अर्दोआन यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे.

अर्दोन यांनी या प्रकरणी सांगितले की, टीमने संपूर्ण परिसरातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढल्या आहेत ज्यात किल्ल्याचे अवशेष आहेत, ज्या परिसराच्या इतिहासाशी संबंधित आहेत. अर्दोन यांनी सांगितले की, काही काळापूर्वी पहिले मंदिर सापडले होते आणि आता टीमला राजा मिनुआचे दुसरे मंदिर देखील सापडले आहे.

थंडीमुळे किल्ल्यातील उत्खननाचे काम बंद करण्यात आले आहे. सध्या हिवाळा पाहता त्यांनी या ठिकाणी खोदाईचे काम बंद केले आहे. हिवाळा ओसरताच म्हणजेच थंडीच्या वातावरणात ओलावा राहील, त्यानंतर पुन्हा उत्खननाचे काम सुरू केले जाईल.

अर्दोन म्हणाले, “उत्खननादरम्यान, आम्हाला दुसरे मंदिर सापडले, जे आम्हाला राजा मिनुआने बांधले होते असे वाटते. आम्हाला मंदिराजवळ एक समाधी देखील सापडली आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात प्राचीन काळातील भांडीही सापडली आहेत. उत्खननासाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. सापडलेली भांडी मध्यम युगातील आहेत. यासोबतच किल्ल्याच्या बाहेर एक स्मशानभूमीही सापडली आहे, ज्याचे मिळणे अत्यंत महत्त्वाची मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
आईची शेवटची इच्छा पुर्ण करण्यासाठी मुलीने ICU मध्येच केले लग्न; 2 तासांनी आईने सोडले प्राण
फक्त 10 सेकंदात ‘या’ चित्रातील मासा शोधून चेक करा तुमचा IQ; भले भले झालेत फेल
समृद्धीवर वेगाच्या थरारात भीषण अपघात; तब्बल चार पलट्या मारत गाडी रस्त्याच्या पलीकडे, गाडीतील सहा जण…

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट धार्मिक

Join WhatsApp

Join Now