आरारारा खतरनाक…, इंग्लडची राणी एलिझाबेथनं कापला तलवारीनं केक, व्हिडीओ तुफान व्हायरल

वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. तलवारीने केक कापणं गुन्हा असल्याने ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत तलवारीने केक कापला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचेही आपण पाहिले आहे. सध्या तर वाढदिवस असो किंवा कोणताही कार्यक्रम असो तलवारीने केक कापणं हा तर ट्रेंड झाला आहे. मात्र हाच ट्रेंड अनेकांना महागात पडला आहे.

मात्र आता चक्क एका राणीनं तलवारीने केक कापल्याचे समोर आले आहे. आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता चर्चेचा विषय बनला आहे. केक कापणारी राणी दुसरी तिसरी कोणी नसून इंग्लडची राणी एलिझाबेथ आहे. जी-७ राष्ट्रांची शिखर परिषद सुरू असून, या दरम्यान एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान या राष्ट्रांचा सहभाग असलेली जी-७ परिषद सुरू आहे. नैर्ऋत्य इंग्लंडमध्ये तीन दिवसांची ही परिषद चालणार असून, या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होत.

या कार्यक्रमाचा उद्देश हा होता की, ‘द डचेस ऑफ कॉर्नवाल’ लोकांनी एकत्र यावं, सोबत जेवण करावं आणि मित्रत्वाचे संबंध दृढ करावे, अशा उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर राणी एलिझाबेथ यांना केक कापण्याची विनंती करण्यात आली.

त्यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकाकडून तलवार घेतली. केक कापण्यासाठी चाकू असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. मात्र, राणीने तलवारीनेच केक कापला. मात्र झालं असं की, हा संपूर्ण प्रकार आता कॅमेऱ्यात कैद झाला. व आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. आत व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होतोय, व युजर्स आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे.

महत्वाच्या बातम्या
स्वत:च्या लग्नात नाचनारी ती नवरी म्हणतीय म्हणतीय तुझं नि माझं लफडं गावात गाजलं; पहा भन्नाट व्हिडीओ
कुठं गेली माणुसकी! वृद्ध वाहून जात होता आणि ग्रामस्थ व्हिडीओ काढत होते, पहा भयानक व्हिडीओ
अजब प्रेम की गजब कहाणी! १०वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहचला थेट स्वित्झर्लंडला
अंडे का फंडा! एक हजार वर्षांपूर्वीच्या अंड्यातून निघाले असे काही की संशोधकही झाले हैराण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.