“दोन पोलिसांकडून अर्णव गोस्वामीला मारहाण”; गोस्वामीच्या वकीलांचा दावा

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना मुंबईमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी अर्णब गोस्वामी यांना पोलिसाकंडून मारहाण झाली असल्याचे स्वतः अर्णव गोस्वामी यांनी सांगितले आहे. तसेच, त्यांचे वकील गौरव पारकर यांनी देखील पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबद्दलची माहिती त्यांच्या पत्नीला देखील दिली गेलेली नव्हती. त्यांना दोन पोलिसांकडून मारहाण झाली आहे. शिवाय, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का दिला गेला व त्यांचे घर तीन तासांसाठी बंद करण्यात आले. त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झालेली आहे आणि ज्या ठिकाणी दुखापत आहे, तिथे बांधलेली पट्टी देखील पोलिसांकडून काढण्याचा प्रयत्न झाला.” असा आरोप अर्णब गोस्वामीच्या वकिलाकडून करण्यात आला आहे.

अर्णव गोस्वामींच्या हाताला व पाठीत मारले, त्यांना त्रास दिलेला आहे. अटकेवेळी त्यांना बेल्टने पकडले होते. त्यांच्या पाठीवर जखम झालेली आहे. असेही अर्णव गोस्वामीच्या वकीलांनी सांगितले आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी आज सकाळी पत्रकार अर्णव गोस्वामींना मुंबईतून अटक केली. त्यानंतर त्यांना सकाळी साडेअकराच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दीड तास चौकशी केल्यानंतर गोस्वामी यांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.