‘या’ कारणामुळे कोर्टाने अर्णब गोस्वामीला चांगलेच खडसावले

रिपब्लिक टीव्हीचा मुख्य संपादक अर्णब गोस्वामीला ५२ वर्षांच्या इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रायगड पोलिसांनी बुधवारी सकाळी अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांना अटक केली.

मुंबई आणि रायगडमधील हाय व्होल्टेज नाटकानंतर अर्णब गोस्वामी यांना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने अर्णब गोस्वामीला चांगलेच खडसावले.

काल दुपारी एक वाजता अर्णब गोस्वामीला अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले आणि फोन बंद करण्याचे निर्देश दिले. अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अर्णबच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला आहे.

न्यायालयात अर्णब गोस्वामींनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यामुळे न्यायालयाने त्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांना पुन्हा पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पण अर्णब गोस्वामीला मारहाण झाल्याचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक झालेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती

त्या दिवशी करण जोहरने मीडियासमोर गोविंदाची जाहीर माफी मागितली होती; असं काय घडलं होतं?

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.