अशी गेली अर्णबची तुरूंगातली पहीली रात्र; मच्छरांनी फोडल्यानंतर तळमळत होता..

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या आरोपाखाली ‘रिपब्लिक टीव्ही’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे. अलिबाग कारागृहात कोविड -१९ केंद्र म्हणून स्थापित केलेल्या शाळेत अर्णबने रात्र काढली. पण अर्णबला मच्छरांनी एवढा त्रास दिला की तो रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता.

अर्णब गोस्वामीला वैद्यकीय तपासणीसाठी बुधवारी रात्री सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत नेण्यात आले. या शाळेत तात्पुरते तुरुंग उभारण्यात आले आहे. येथील कोठडीत त्याने रात्र काढली. पण ही रात्र त्याच्यासाठी सोपी नव्हती. मुंबईत आलिशान घरात राहणाऱ्या अर्णबला आणि इतर दोन आरोपींना एका खोलीत रात्र काढावी लागली.

एवढंच नाही तर रात्री त्याला दालरोटीचा भत्ता दिला. त्याला झोपायला सतरंजी दिली होती. सतरंजीवर झोपल्यावर मच्छरांनी अर्णबला मच्छर एवढा त्रास दिला की तो रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. मच्छरांनी असंकाही अर्णबला फोडले की त्याचा जीव तळमळत होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना अलिबाग जेलमध्ये न नेता क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. त्यामुळे अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडी अलिबाग नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

…म्हणून अलका कुबलने आपल्या दोन्ही मुलींना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवलेय

संपादकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे शाहरुखला खावी लागली होती जेलची हवा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.