‘विमानतळ हस्तांतरणाचा ठराव कोणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना? मग आंदोलन कशाला?’

मुंबई । सध्या मुंबईत विमानतळाच्या नावावरून राजकीय वातावरण तापले आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी यांच्या कंपनीकडे गेल्यामुळे त्याठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे नावाचे बोर्ड लावण्यात आले होते. यामुळे हा वाद सुरू झाला होता.

सर्व बोर्ड्स शिवसैनिकांनी फोडले आहेत. यामुळे वातावरण तापले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी विमानतळाला लावलेले अदानी एअरपोर्ट्सचे नाव फोडून टाकले. याला फक्त महाराजांचे नावं असेल असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

आता यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावर भाष्य केले असून शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाला य धक्का लावल्यास भाजप विरोध करेलच.

असे असताना मात्र हस्तांतरणाचा ठराव कॅबिनेट मधे कोणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना? मग बाहेर आंदोलन कशाला ? ठरावाच्या वेळी नाव, अटी शर्ती याची काळजी का घेतली नाही. विरोध पण आपणच करायचा आणि समर्थन ही द्यायचे, अशी शिवसेनेची टक्केवारीसाठी चाललेली आंदोलन आहेत.

यामुळे आता यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विमानतळाच्या नामकरणावरून सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून आंदोलन देखील केली जात आहेत.

ताज्या बातम्या

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बिकिनीतील हॉट फोटोमुळे सोशल मीडियावर धुरळा, चाहते झाले घायाळ

“काय होतीस तू काय झालीस तू…”; ‘तारक मेहता…’मधील सोनूचा विचित्र अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

कधीही तक्रार करू नका आणि स्पष्टीकरण देऊ नका म्हणत शिल्पाने काढता पाय घेतला; सोशल मिडीयावर असे स्टेटमेंट केले जारी…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.