जणू काही सेहवागच फलंदाजी करत होता असं वाटलं; माजी क्रिकेटपटूने केले पंतचे कौतुक

मुंबई | पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याने भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतचे कौतुक केले आहे. रिषभची फलंदाजी पाहून वीरेंद्र सेहवागच डाव्या हाताने फलंदाजी करतोय असे वाटते असे इंझमामने म्हटले आहे.

रिषभ पंतने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात शानदार शतक झळकावलं आहे. यानंतर इंझमाम याने रिषभचं कौतुक केलं आहे. पंतने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी शतक ठोकत संघाच डाव सावरला होता.

रिषभचं कौतुक करताना इंझमाम म्हणतो, रिषभ पंत शानदार फलंदाज आहे. मी मोठ्या काळानंतर दबाव न घेता आक्रमकपणे खेळाणारा खेळाडू पाहिला. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाची ६ बाद १४६ नाजूक स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर ज्या प्रमाणे पंत खेळला त्याला तोड नाही.

पंतने जी कामगिरी केली तस दुसरा कोणीच करू शकत नाही. तो जितक्या शानदारपणे वेगवान गोलंदाजांना खेळतो तितकाच चांगल्या रित्या तो फिरकीपटूंचा सामना करतो. मी पंतच्या शतकी खेळीचा आनंद लुटला.

रिषभ पंतची बॅटिंग पाहून असं वाटलं की जसं सेहवागच डाव्या हाताने खेळतोय अशा शब्दात इंझमाम-उल-हकने रिषचे कौतुक केले आहे. यासंदर्भात इंझमाम त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होता.

महत्वाच्या बातम्या-
खोटं खेळून सेहवागचे शतक हुकवणाऱ्या खेळाडूवर आता आलीय ड्रायव्हरची नोकरी करून पोट भरण्याची वेळ
वीरेंद्र सेहवागची तुफान फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवर चौकार तर षटकार खेचत अर्धशतक; पहा व्हिडीओ
मोहम्मद सिराजला नडणाऱ्या बेन स्टोक्सशी भिडला विराट, पंचांना करावा लागला हस्तक्षेप; पहा व्हिडीओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.