मुंबई | कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची ओळख आहे. बदली आणि तुकाराम मुंडे हे समिकरण अलिकडे सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. मे महिन्यात नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदावरुन त्यांची बदली करण्यात आली होती. नागपूर महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधानंतर त्यांची बदली झाली. आता मुंडे यांना राज्याच्या मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्य सरकारने चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये गेले आठ-नऊ महिने पदाविना असलेले तुकाराम मुंडे यांना नवीन पदभार मिळाला आहे. यापुर्वी त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून नेमण्यात आले होते. परंतु त्यांनी पदभार घेण्याआधीच दुसऱ्या अधिकाऱ्याची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती.
तुकाराम मुंडे यांची कार्यशैली कायमच वादग्रस्त राहिली आहे. राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणारा प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी नागपूरमध्ये चांगले काम केले होते. त्यांच्या बदलीमुळे नागरिकांमध्ये रोष होता.
बदलीपुर्वी नागपूर महापालिकेत तुकाराम मुंडे आणि सत्ताधारी यांच्यात बराच संघर्ष पाहायला मिळाला होता. यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महापौर जोशी यांना याचा फटका बसला होता. त्यांचा पराभव हा तुकारम मुंडे यांच्या बदलीमुळेच झाल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुकाराम मुंढेच नागपूरच्या विजयाचे खरे शिल्पकार! महापौर संदीप जोशींचा पराभव निश्चित
१५ दिवसांत तुकाराम मुंढे यांची बदली रद्द; सरकारचा आदेश
तुकाराम मुंढेच नागपूरच्या विजयाचे खरे शिल्पकार! महापौर संदीप जोशींचा पराभव निश्चित