पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी ४ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती; अजित पवारांच्या आदेशानंतर निर्णय

 

पुणे | पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी आणि उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुण्यात ४ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, तसेच कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची याकामी नियुक्ती झाली आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत टेस्टिंग इंचार्ज म्हणून आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात काल १२४५ नवीन कोरोना रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २९ हजार ८४४ झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.