APPLE ची आता इलेक्ट्रीक कार येणार, ‘या’ मोठ्या कंपन्यांना बसणार धक्का

स्मार्टफोन उत्पादनात जगभर प्रसिध्द असलेली APPLE कंपनी आता वाहन क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सूरू होती. ही बातमी आता खरी ठरली असून APPLE  इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. ह्युंदाई कंपनीसोबत करार करत APPLE इलेक्ट्रिक कार बनवणार आहेत. या करारानंतर ह्युंदाई कंपनीच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२४ पर्यंत ह्युंदाई कंपनी APPLE च्या कारचे उत्पादन सूरू करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, APPLE कंपनी २०१४ पासून प्रोजेक्ट टायटन या नावाने वाहन बाजाराच उतरण्याचं काम करत आहे. कंपनीने कारचं डिझाइनही बनवलं होतं. परंतु त्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअरवर जास्त लक्ष देण्यास सूरूवात केली.

APPLE इनसायडरच्या रिपोर्टमध्ये टीएफ सिक्युरिटीजचे मिंग ची कुओ यांच्या माहितीनुसार, सुरूवातीला APPLE कंपनी ह्युंदाईसोबत कार बनवणार आहे. त्यानंतर युरोपमधील कार क्षेत्रातील नामांकित कंपनी पीएसएसोबत कार बनवणार आहे.

APPLE च्या कारचं उत्पादन करण्यासाठी ह्युंदाईची सबसिडरी कंपनी किया मोटर्स अमेरिमध्ये APPLE कारचे उत्पादन करण्यास सुरू करणार आहे. २०२४ पासून वर्षाला १ लाख कार बनवल्या जाणार आहेत. हळूहळू वाहनांच्या विक्रीनुसार वर्षाला चार लाख कारचं उत्पादन करण्यात येणार आहे. यासाठी APPLE आणि किया मोटर्समध्ये ३.५ अब्ज डॉलरचा करारही झाला आहे. किया मोटर्स जॉर्जियामध्ये प्लँट उभारून या कारचं उत्पादन करणार आहे.

यावर्षी कियाच्या ५ कार मार्केटमध्ये येणार आहेत. ज्या कार पुर्णपणे इलेक्ट्रिक असून १८ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ८०%  टक्के बॅटरी चार्जिंग होणार आहे.

APPLEचा गुगलशी होणार सामना

APPLE ने वाहन क्षेत्रात पाऊल टाकले खरं पण त्यांचा सामना गुगल कंपनी आणत असलेल्या ऑटोमेटिक विना ड्रायव्हर कारशी होणार आहे. APPLE ही ब्रँडेड कंपनी स्मार्टफोन, लॅपटॉप अशा अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे या ब्रँडची क्रेझ अनेकांमध्ये आहे.
म्हत्त्वाच्या बातम्या-
मालिकेत भोळी दिसणारी ‘अंगूरी भाभी’ खऱ्या आयुष्यात आहे खूपच हॉट आणि ग्लॅमरस, पाहा फोटो
‘नरेंद्र मोदींचा फोटो वापरून आमचे घर चालत नाही’; मोदींच्या भावाची मोदींवर टीका
दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग भडकली, म्हणाली..
तुम्हाला म्हाडामध्ये घर घ्यायचय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.