भन्नाट ऑफर! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ऍपलचे ‘हे’ फोन्स, वाचा सविस्तर…

मुंबई | आजकाल स्मार्टफोनशिवाय काहीच शक्य नाही असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. अनेकांना स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. पण त्यांचे बजेट कमी आहे. जवळपास सगळ्याच ई-कॉमर्स कंपन्या स्मार्टफोनवर जबदस्त सूट देत आहेत. परंतु तुम्हाला अशा वेबसाईटची माहिती मिळणार ज्यावर तुम्ही कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता.

महत्वाची बाब म्हणजे या वेबसाईटवर तुम्हाला जुने फोन उपलब्ध करून दिले आहेत. या वेबसाईटचे नाव कॅशिफाई(Cashify) असे आहे. याठिकाणी तुम्ही तुमचे जुने फोन विकू शकता किंवा खरेदी करू शकता.

विशेष बाब म्हणजे या वेबसाईटवर तुम्हाला ऍपल आयफोन ६ आणि आयफोन ६ एस हे मोबाईल फोन उपलब्ध आहेत. हे फोन तुम्ही १० हजारांपेक्षा कमी किमंतीत खरेदी करू शकता. या फोनबाबत वेबसाईटवर सविस्तर माहिती दिलेली आहे.

कॅशिफाईवर तुम्ही iPhone 6 हा १ जीबी रॅम आणि ३२/६४ जीबी स्टोरेजसह चांगल्या स्थितीत फक्त ९४९९ रुपयात खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर तुम्हाला ६ महिन्यांची वॉरंटी आणि ईएमआयची सेवा मिळते. त्यामुळे आर्थिक बजेट कमी असणाऱ्यांना चिंता करण्याची कारण नाही.

ऍपल प्रेमींमध्ये iPhone 6s चांगलीच क्रेझ पाहायला मिळते आहे. कॅशिफाईवर हा स्मार्टफोन ९१४९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. नव्या फोनप्रमाणे ६ महिन्याची वारंटी आणि ईएमआयची सुविधा दिली गेली आहे.

या ई-कॉमर्स वेबसाईटच्या निमित्ताने अनेकांना चांगला मोबाईल मिळणार आहे. परंतु आपण फोन खरेदी करणार असाल तर त्यापुर्वी सर्व गोष्टींची चांगली तपासणी करा.

महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! दीड लाखांची बाईक फक्त ४५ हजारात, जाणून घ्या कुठे अन् कशी
भारतात OLA चा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना, दर सेकंदाला तयार होणार एक ई-स्कूटर
पेट्रोलने शंभरी गाठलीय, खरेदी करा दमदार आणि आकर्षक लूकमधील ‘या’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.