सुबोध भावे (Subodh Bhave): मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या चर्चेत आहे. एका कार्यक्रमात सुबोध भावे यांनी ‘लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम दिलं आहे’ असे वक्तव्य केले होते. आता या कार्यक्रमातील संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करत सुबोधने त्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
‘आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन सतत करिअरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे,’ असे ते या भाषणात बोलले होते. यावर सुबोधने अनेकांनी त्याच्या या भाषणाचा चुकीचा अर्थ काढून त्याला ट्रोल करून गोंधळ घातला आहे, असे सांगितले.
भाषणाचा व्हिडीओ शेअर करत सुबोध भावेने “नमस्कार, काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे. त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ. आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्या आधी एकदा “संपूर्ण भाषण” त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा.” असे लिहिले आहे.
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी ‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नृत्य-नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुबोध भावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी केलेलं भाषण सध्या गाजलं आहे.
सुबोध भावे यांनी शिक्षण आणि राजकारण याविषयी केलेल्या वक्तव्याने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. याबद्दल त्यांना प्रचंड ट्रोलही केले गेले होते. यानंतर फेसबुकवर पोस्ट टाकत त्यांनी याचा खुलासा केला आहे. यासोबतच त्यांची त्यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
MNS: शिंदेगटाचे लक्ष्य आता मनसेवर! तब्बल १०० पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत पाडले मनसेला खिंडार
Mumbai: बिल्डींगमध्ये राहणारी ती महीला शेजाऱ्यांना पाठवायची पाॅर्न व्हिडीओ; सत्य समजल्यावर सगळेच हादरले
एकनाथ शिंदेचा पुण्यात येताच अजितदादांना धक्का; एका झटक्यात बदलला ‘तो’ निर्णय
Hrithik Roshan: रोशन पिता-पुत्राच्या जोडीने दिले अनेक हिट चित्रपट, पण ‘हे’ चित्रपट झाले इंटरनॅशनल फ्लॉप