सातारा(Satara) जिल्हयातील माण तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माण तालुक्यामधील दहिवडी(Dahivadi) शहरातील एका नगरसेवकाचे अपहरण झाले होते. हा नगरसेवक अपक्ष आहे. पण राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी लगेच या अपहरणाचा छडा लावला आणि पोलिसांकडून अपहरणकर्त्यांना अटक केली.(apksh nagarsevak from dahivadi kidnapped in pune)
सध्या दहिवडी नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या नगरपंचातीवर सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने नऊ सदस्यांची बेरीज केली होती. माण तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख(Prabhkar Deshmukh) यांनी दहिवडी नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार अशी घोषणा देखील केली होती. पण विरोधक देखील दहिवडी नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होते. यातूनच हे अपहरण नाट्य घडले आहे.
राजेंद्र साळुंखे हे प्रभाग क्रमांक १२ मधून दहिवडी नगरपंचायतीसाठी अपक्ष म्हणून निवडून आले होते. राजेंद्र साळुंखे हे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत पुणे जिल्ह्यात सहलीवर होते. सहलीवर असताना राजेंद्र साळुंखे यांच्यावर काही लोक नजर ठेऊन होते. हे लोक राजेंद्र साळुंखे यांचे अपहरण करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होते.
संधी मिळताच या लोकांनी राजेंद्र साळुंखे यांचे अपहरण केले. एका बेसावध क्षणी त्यांना उचलण्यात आले. राजेंद्र साळुंखे यांचे अपहरण झाल्याची बातमी समजताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी या प्रकरणात तातडीने हालचाली करत पोलिसांना याची माहिती दिली.
प्रभाकर देशमुख यांनी नगरसेवकाचे अपहरण झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिली. राष्ट्रवादीच्या वजनदार नेतेमंडळीचे फोन झाल्यानंतर पोलिस यंत्रणा झपाट्याने कामाला लागली. केवळ अर्ध्या तासात राजेंद्र साळुंखे याच्या अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. तोपर्यंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दहिवडी पोलीस ठाण्याजवळ जमले होते.
दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी अत्यंत जबाबदारीने सर्व परिस्थिती हाताळून जमलेला हा जमाव शांत केला. या घटनेची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात होत आहे. यासोबत माण तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांचे देखील कौतुक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
लिव्हइनमध्ये राहणे अयोग्य नाही, असे म्हणणाऱ्या न्यायाधीशांना संपवले पाहीजे – संभाजी भिडे
जितेंद्र आव्हाड यांचं मुलांच्या जातीवरील ट्वीटने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ; वाचा काय आहे ट्विटमध्ये
TRAI चा मोठा निर्णय: आता २८ नाही तर ३० दिवसांचा मिळणार रिचार्ज, युजर्सना मिळाला दिलासा