Share

“प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडायचे की दाऊद इब्राहिमसमोर?”, घोडेबाजारच्या आरोपांवर अपक्ष आमदाराचा राऊतांना सवाल

राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी या निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार(Sanjay Pawar) यांचा पराभव केला आहे. राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असताना देखील शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. (apaksh mla ask shivsena leader sanjay raut )

राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची ९ मते फुटली आहेत. त्याचा फायदा भाजपला झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने घोडेबाजार करून ही निवडणूक जिंकली आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

यावेळी आरोप करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही आमदारांची नावे घेतली आहेत. त्यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांचे देखील नाव समाविष्ट आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, “संजय राऊत ब्रम्हदेव आहेत का हे समजत नाही. मतदान हे गोपनिय असते. आम्ही त्यांना मत दिले नाही हे त्यांना कसे कळले. ज्यावेळी महाविकास आघाडी झाली त्यावेळी शिवसेना नंतर आली आहे. लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे कोणी मतदान दिले नाही असे सांगण्याचा अधिकार शिवसेना नेते संजय राऊत यांना नाही”, असे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले आहेत.

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार पुढे म्हणाले की, “मी पहिल्या दिवसापासून दगाफटका केलेला नाही. माझ्या मतदार संघातील महत्वाचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री कमी पडले, अशी खंत मी बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री कुटूंब प्रमुख आहेत. आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांना सांगायच्या नाहीत तर मग दाऊद इब्राहिमला सांगायच्या का? असा सवाल अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केला आहे.

अपक्ष आमदार संजय शिंदे म्हणाले की, “आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. मतदानच्यावेळी महाविकास आघाडीचे नेते आमच्यासोबत होते. पराभवानंतर आरोप करणे चुकीचे आहे. या सर्व गोष्टी मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. आमच्यावर विश्वास नव्हता तर आम्हाला मतदानाला घेऊन जायचे नव्हते”, असे संजय शिंदे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
आमचे देवेंद्रजी आहेतच तसे! महाडिक जिंकताच चंद्रकांत पाटलांनी फडणवीसांचं केलं तोंडभरून कौतुक
शिवसेनेच्या पराभवानंतर संभाजीराजेंचा तुकोबांच्या अभंगातून टोला, म्हणाले, वाघाचा कलभूत…
‘शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले’, मनसेचा खोचक टोला

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now