प्रेमासाठी कायपण! प्रेमात वेड्या असणाऱ्या प्रियकरानं मागितली भर रस्त्यात प्रियासीकडून किस, व्हिडिओ व्हायरल

मुंबई। आजवर आपण अनेक मजनू किंवा प्रेमवीर असे बघितले आहेत जे प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. बहुतेक तरुण हे मुलींना पटवण्यासाठी वेगवेगळ्या स्टाईल मारत असतात. पण अशा घटना आपल्यासाठी नवीन नाहीयत. आधीही अनेक अशी प्रकरण समोर आली आहेत, ज्यात प्रेयकर लाडात येऊन भर रस्त्यात नकोत चाळे करत असतात.

असाच एक व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक तरुण भर रस्त्यात प्रेयसीकडून किस मागत आहे. व आजूबाजूची मंडळी या तरुणाचे चाळे पाहून हसत आहे. या तर पाहुयात व्हिडिओमध्ये काय आहे.

हा व्हिडिओ jaat_k_jokes या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपलं हसू आवरत नाहीय तर कित्येकजण या व्हिडिओला मजेशीर कमेंट्स करत आहेत. यामध्ये जर आपण नीट ऐकलं तर या व्हिडिओत त्या दोघांचं बोलणं देखील ऐकायला येत आहे.

या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक तरुण तरुणीकडून किस मागताना दिसतो आहे. तरुण रस्त्यावर झोपला आहे व रस्त्यावर ड्रामा करताना करत आहे. त्याच्या आजूबाजूला बरेच लोक जमा झाले आहेत. समोर दोन तरुणी उभ्या आहेत.

त्यातील एक तरुणी त्याला किस दिल्यानंतर तू जाशील ना, असं विचारते. तरुण हो म्हणतो आणि पप्पी दे, पप्पी दे म्हणत राहतो. त्यावेळी ज्या तरुणीकडून हा तरुण किस मागत असतो, ती त्या तरुणाजवळ जाते. सुरुवातीला तुझं तोंड फोडेन असं म्हणते. पण दुसऱ्याच क्षणी त्याचा गाल आपल्या हातात धरते आणि त्याच्या गालावर किस करते.

तरुणीने त्याची मागणी पूर्ण करताच त्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येतो. जणू काही आपण एक मोठी लढाईच जिंकली, असेच हावभाव या तरुणाच्या चेहऱ्यावर आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला जमा झालेल्या लोकांना या दोघांचे चाळे बघून धक्काच बसला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.