माझ्याबद्दल काही म्हणाल तर नागडं करेन, इस्त्रायल मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांना कंगनाने सुनावले

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणावत वेगवेगळी वक्तव्य करत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोल केले जाते. आता पुन्हा एकदा तिला ट्रोल करण्यात आले आहे. कंगनाने नुकतीच इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली.

या पोस्टमध्ये इस्त्रायलबद्दल कंगनाला असलेल्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या ट्रोलर्सवर कंगना चांगलीच भडकली. कंगना रणावतने इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेल्या वादावर तीच मत मांडत आहे.

कंगना ट्रोल करणार्‍यांना म्हणाली, तुम्ही कसे इस्त्रायलला बेकायदेशीर म्हणू शकता. या जगात त्यांचे स्थान नाही का? फक्त गुंडगिरी करायची आणि समोरून कुणी केली तर मात्र रडून गोंधळ घालायचा. जरा लाज बाळगा संपूर्ण जगासमोर तुमचा पर्दाफाश झाला आहे आणि मझ्याबद्दल जर बोलाल तर नागडं करून टाकेन. असे म्हणत कंगना ट्रोल करणाऱ्यांवर भडकली.

तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता की इस्त्रायलची स्थापना अगदी योग्यरीत्या झाली आहे. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवत त्यांनी युनायटेड नेशनच्या मदतीने या देशाची स्थापना केली आहे. सहा मुसलमान देशांनी त्यांच्यावर आक्रमण केली.

जे लोक रडत आहेत आणि म्हणत आहेत की मला काही माहीत नाही, तर बाळांनो मी सर्वांची आई आहे. त्यामुळे यापुढे लायकीत रहा, असे म्हणत कंगनाने सर्वांना सुनावले आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

कोरोना काळात देखील कंगनाला अनेकदा ट्रोल करण्यात आले. गंगा नदीत टाकलेले मृतदेह यावरून देखील तिला ट्रोल करण्यात आले होते. अनेक वेगवेगळ्या विषयांवर वक्तव्य करून कंगना सतत चर्चेत असते.

ताज्या बातम्या

पतीने नसबंदी केल्यानंतरही पत्नी गर्भवती; डॉक्टरांच्या तपासणीत धक्कादायक कारण आलं समोर

टाटांचा विजयी झेंडा! टाटा नेक्साॅन ठरली भारतातील सर्वाधिक खपाची नंबर वन कार

कोरोना नियम मोडणाऱ्यांना मध्यप्रदेशात भलतीच शिक्षा; लिहायला लावतात भगवान श्रीरामाचे नाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.