अर्नब अटक! अन्वय नाईकला आता तरी न्याय मिळणार का ?

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आज रायगड पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आली आहे.

आता याचप्रकरणी अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आल्यानंतर अन्वय नाईकला तब्बल अडीच वर्षानंतर तरी न्याय मिळणार का? असा सवाल निर्माण होत आहे. मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामीनं पैसे थकवल्याचा आरोप करत अलिबाग येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच प्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब यांच्यावर ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , वरळी येथील गोस्वामी यांच्या राहत्या घरी रायगड पोलिसांसह मुंबई पोलीस अधिकारी दाखल झाले. याठिकाणी पोलिसांनी त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबाने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. कायद्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत असे पोलिसांनी सांगितले.

अन्वय नाईक प्रकरण काय आहे?
अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तसेच तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.

तसेच अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या
अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अर्णब गोस्वामींवर केले ‘हे’ गंभीर आरोप; प्रकरण चिघळलं
मनुस्मृती प्रकरण: अमिताभ बच्चन विरोधात भाजप आमदाराकडून तक्रार दाखल
…त्यामुळे शक्ती कपूर यांनी श्रद्धाला फरहानच्या घरातून फरफटत बाहेर काढले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.