तान्हूल्या वामिकाला पाठकुळी घेऊन अनुष्का विराटसोबत मैदानात; फोटो पाहून डोळे पाणावतील

मुंबई : काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. वामिकाचा जन्म होऊन दोन महिने झाले आहेत पण आतापर्यंत कपलने मुलगी वामिकाचा चेहरा चाहत्यांना दाखविला नाही.

इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर असून मंगळवारपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना पुण्यात होणार असून सामन्यासाठी खेळाडू पुण्यात दाखल होत आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीही पुण्यात आला आहे.

नुकतच विराट कोहली आणि अनुष्का शर्माला वामिकासोबत एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आला आहे. विरुष्काचे बाळासोबतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोत अनुष्काने वामिकाल उचलून घेतल्याचं दिसतं आहे. तर विराट कोहली सर्व बॅगस् सांभाळत आहे.

दरम्यान, अनुष्काने वामिकाला जवळ कवटाळून पकडल्याचं दिसतंय. त्यामुळे विरुष्काने ठरवल्याप्रमाणे कोणत्याच फोटोत वामिकाचा चेहरा दिसत नाहिय. तर विराटने सर्व बॅगस् सांभाळत एक उत्तम वडील होण्याचं कर्तव्य पार पाडलंय असं नेटकऱ्यांकडून म्हंटलं जातं आहे.

याचबरोबर विरुष्काने त्यांच्या लेकीला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते पूर्ण प्रयत्नदेखील करताना दिसत आहेत. त्याचसोबत चांगले पालक बनण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मोदी सरकारच्या या योजनेमुळे एप्रिलपासून तुमचा पगार कमी होण्याची शक्यता

फडणवीसांनी शरद पवारांना पुराव्यानिशी उघडे पाडले; उतारवयात इतकी बेइज्जती होऊ नये

खुशखबर! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, मोदी सरकारचे मोठे संकेत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.